मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दोन मुलांची आई 14 वर्षांच्या मुलासोबत पळाली; पोलिसांच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा

दोन मुलांची आई 14 वर्षांच्या मुलासोबत पळाली; पोलिसांच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा

दोन मुलांची आई त्या अल्पवयीन मुलीच्या इतक्या प्रेमात होती की ती तिच्याबरोबर पळून गेली. संबंधित मुलाच्या कुटुंबीयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना एका ठिकाणावरून ताब्यात घेतलं.

  • Published by:  News18 Desk
कोरबा, 06 जून : एक 32 वर्षीय विवाहित महिला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून दोन मुलांची आई असलेली ही महिला अल्पवयीन मुलाला घेऊन फारार झाल्यानं सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. संबंधित अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला 14 वर्षीय मुलाच्या इतकी प्रेमात होती की, तिनं आपल्या कुटुंबाचा घरातील कोणत्याही व्यक्तींचा विचार केला नाही. विशेष म्हणजे या महिलेचा पती एक सरकारी कर्मचारी आहे. दोन मुलांसह त्यांचा संसार सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. हा सर्व प्रकार छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील माणिकपूरमध्ये घडला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेवरून चर्चा रंगल्याचे सांगण्यात येतंय. दोन मुलांची आई त्या अल्पवयीन मुलीच्या इतक्या प्रेमात होती की ती तिच्याबरोबर पळून गेली. संबंधित मुलाच्या कुटुंबीयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना जांजगीर येथून ताब्यात घेतलं आहे. महिला घरातून गायब असल्यानं तिच्या नातेवाईकांनीही तिचा शोध सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करून तिची रवानगी तुरुंगात केली आहे. लैगिक शोषण, शारीरिक छळ, बलात्काराशी संबंधित बहुतांश घटनांमध्ये आपण एखाद्या तरुणाविरूद्ध किंवा एखाद्या पुरुषाविरूद्ध कारवाई केल्याचे ऐकले असेल, परंतु कोरबा जिल्ह्यातील माणिकपूर चौकीमध्ये पोलिसांनी सरकारी पदावर तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा - मुलींनी आईची हत्या करुन तिच्याच साडीने घेतला गळफास; चार दिवस तिघींचे मृतदेह घरात पडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू असताना जांजगीर जिल्ह्यातील नवागढ येथील अल्पवयीन मुलाच्या मामाच्या घरी दोघेही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही ताब्यात घेतले. चौकी प्रभारी माणिकपूर अशोक पांडे म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी पोक्सो कायद्यासह इतर कलमांखाली पोलिसांनी गुन्हा केला आहे. संबंधित महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला तुरुंगात पाठविण्यात आलं आहे.
First published:

Tags: Physical attraction, Rape

पुढील बातम्या