रायगड, 25 मार्च : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात एका शाळकरी मुलीवर शाळेच्याच बाथरूममध्ये अत्याचार (Minor girl abused in school toilet in Pune) झाल्याची घटना समोर आली. ही घटना ताजी असतानाच आता रायगड जिल्ह्यातून (Raigad district) धक्कादायक वृत्त आलं. एका अल्पवयीन मुलीवर बागेत अत्याचार (Minor girl raped in garden) झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका अनोळखी इसमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 मार्च रोजी घडली. 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी मैत्रीणीसोबत एका बागेत गेली होती. त्यावेळी गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या रंगाने काळसर आणि शरीरयष्टीने जाडजुड असलेल्या एका अनोळखी इसमाने तिच्यासोबत अतिप्रसंग केला आणि तेथून पलायन केले.
वाचा : शेअर मार्केटच्या नादाला लागले, 50 लाखा बुडाले; बीडमध्ये गुंतवणूकदार हताश
आरोपी हा घटनास्थळावरुन पळून जात असताना त्याचा मोबाइल तिथेच पडला. आपला मोबाइल पीडित मुलीने घेतला आणि तो घेऊन जात असताना आरोपी पुन्हा तेथे आला. आरोपीला पाहून भेदरलेल्या मुलीने तो मोबाइल तिथेच टाकून पळ काढला आणि आपला जिव वाचवला.
त्यानंतर आरोपीने तो मोबाइल घेवून पलायन केले. याबाबत माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक निरिक्षक सतीष अस्वार हे करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली. शाळेतील बाथरूममध्ये आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी संशयित आरोपीचं स्केचही प्रसिद्ध केलं होतं. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शिवाजीनगर नामांकित शाळेच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने पकडलं आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत होता. आरोपी हा वॉचमनचं काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगेश पदमुळू (वय 36 वर्षे) नावाच्या या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Maharashtra News, Raigad