जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 100 कोटी वसूली प्रकरण: चांदीवाल आयोगाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस, आयोग काय अहवाल देणार?

100 कोटी वसूली प्रकरण: चांदीवाल आयोगाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस, आयोग काय अहवाल देणार?

100 कोटी वसूली प्रकरण: चांदीवाल आयोगाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस, आयोग काय अहवाल देणार?

अनिल देशमुख यांच्यापासून सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची बाजू चांदिवाल आयोगाने ऐकली आहे. त्यामुळे आता चांदीवाल आयोग काय अहवाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मार्च : मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) पदावरुन आपली तडकाफकी बदली करण्यात आली यानंतर लेटर बॉम्ब टाकून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी खळबळ उडवून दिली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या उच्चस्तरीय चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगाचा आजचा कामकाजाचा शेवटचा दिवस असून अनिल देशमुख यांच्यापासून परमबीर सिंग एवढच काय तर आरोपीच्या पिंजऱ्यात असणाऱ्या सचिन वाझेची देखील या उच्च स्तरीय चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगाने (Chandiwal Commission) साक्ष नोंदवली आहे. 20 मार्च 2021 या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसूली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर तात्काळ या आरोपांची शाहनिशा करण्यासाठी राज्य सरकारने 30 मार्च या दिवशी एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा केली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल या न्यायाधीशांची या आयोगाच्या अध्यक्षस्थानी नेमणूक केली. कोविडच्या काळात ही या चौकशी आयोगाने आपले कामकाज सुरुच ठेवले होते. यामुळे अनिल देशमुख यांना जेल बाहेर न सोडण्याचा अर्थात चौकशीकरता न जाऊ देण्याच्या आर्थर रोड जेल प्रशासनाच्या निर्णयाने चांदीवाल आयोगालाही आश्चर्य वाटले होते. वाचा :  दिशा सालियनबाबत वक्तव्य प्रकरण:राणे पिता-पुत्रांच्या अर्जावर कोर्टाचा मोठा निर्णय तर कोणतीही परवानगी नसताना आयोग परीसरातच एका बंद खोलीत परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी केलेल्या 2 तास चर्चेमुळे नवी मुंबई पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील झाली. एवढच काय तर मी सचिन वाझेला ओळखत नाही असं देखील अनिल देशमुख यांनी आयोगासमोर सांगितले होते ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एवढंच काय तर आपल्याला बार ओनर्स, हॉटेल व्यावसायिक आणि इतरांकडून मला अनिल देशमुख यांनी पैसे गोळा करायला सांगितले नाही असं म्हणाणाऱ्या सचिन वाझेला मी ओळखत नाही त्याला कधी भेटलो नाही असं धक्कादायक वक्तव्य देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे, पोलीस उपायुक्त राजू भूजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासह जवळपास 20 पेक्षा जास्त जणांची चांदीवाल आयोगाने साक्ष नोंदवली आहे. वाचा :  Navjot Singh Sidhu यांनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील जहाँगीर आर्ट गॅलरी समोरील महसूल प्राधिकरणाच्या इमारतीत या चांदीवाल आयोगाला कार्यालय देण्यात आले होते. याच कार्यालयात नागरी सरंक्षण दलाचे पोलीस महासंचालक म्हणून माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे जवळपास काही महिने कार्यरत होते. मात्र आयोगात त्यांनी कधीच हजेरी लावली नाही. जोपर्यंत त्यांना सर्वोच्च न्यायालयातून अटकेपासून सरंक्षण मिळाले नाही तोपर्यंत परमबीर सिंग या चांदीवाल आयोगात साक्ष नोंदवायला आलेच नाहीत. तर पत्र लिहून प्रतिज्ञापत्र देवून आपण आता पर्यंत दिलेला जबाब आणि टाकलेला लेटर बॉम्ब या व्यतिरिक्त माझ्याकडे आयोगाला सांगण्यास काहीही नाही असं परमबीर सिंग यांनी आयोगाला कळवले होते. एक सदस्यीय उच्च स्तरीय न्यायालयीन चांदीवाल चौकशी आयोगाची मुदत संपत आली असून आयोगाने केलेल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. तो आयोग सभागृहात मांडला जाईल आणि त्यानंतर या आयोगाच्या शिफारशींवर नेमकी काय कारवाई करायची हे राज्य सरकार चर्चा करुन स्पष्ट करेल. त्यामुळे 100 कोटींच्या वसूली प्रकरणात केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणा तपास करत असून चांदीवाल आयोग सर्वात आधी आपला निष्कर्ष देणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात