वॉशिंग्टन, 06 ऑक्टोबर : जगभरात सध्या कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. लाखो नागरिकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) डॉ. मायकेल रायन यांनी नवीन विधान केलं आहे. जगभरातील प्रत्येक 10 व्यक्तींमागील 1 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाला असण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रायन यांनी वर्तवलेली कोरोनाग्रस्तांची संख्या 20 पट आहे. पण केस पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळं येणारा काळ हा कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय समितीला मार्गदर्शन करताना डॉ. मायकेल रायन म्हणाले, ‘सुरुवातीला आकडेवारी शहरी भागांत वाढत होती. पण सध्या ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्ण वाढत आहेत. विविध वयोगटांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून जगभरातील सर्व देशांसाठी हे धोकादायक आहे. वाचा- अलर्ट! मानवी त्वचेवर 9 तास जिंवत राहू शकतो Corona याच विषयी अधिक बोलताना ते म्हणाले, ‘जगभरातील लोकसंख्येच्या 10 टक्के नागरिक हे कोरोनाग्रस्त आहेत. सध्या जगाची लोकसंख्या 7.6 अब्ज आहे. यामध्ये 10 टक्के म्हणजेच 76 कोटी नागरिक कोरोनाग्रस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांना याचा मोठा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही 34 सदस्यीय समिती कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहे. त्याचबरोबर यासाठी फंडिंग गोळा करण्याचं काम देखील ही समिती करते. वाचा- अशा लोकांना कोरोना पडणार भारी; लशीचाही परिणाम होणार नाही डॉ. रायन यांनी कोरोनाने होणाऱ्या मृत्युंविषयी सांगितले, ’ मध्य युरोप आणि भूमध्य समुद्राच्या पूर्वेच्या भागात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. तर दक्षिण आशियामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर आफ्रिका आणि प्रशांत महासागराला लागून असलेल्या परिसरात स्थिती सामान्य आणि दिलासादायक आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाचा वेग वाढत आहे. संक्रमण वेगाने होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणं महत्वाचं असल्याचं देखील त्यांनी यावेळी बैठकीत सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.