मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आणखी एका कोरोना व्हायरसचा इशारा! उंदीर आणि माकडांपासून होऊ शकेल संक्रमण- स्टडी

आणखी एका कोरोना व्हायरसचा इशारा! उंदीर आणि माकडांपासून होऊ शकेल संक्रमण- स्टडी

येत्या काळात उंदीर (Rat) आणि माकडांच्या माध्यमातून (Monkeys) कोरोना विषाणू पसरू शकतो, असं या अभ्यासातून लक्षात आलं आहे.

येत्या काळात उंदीर (Rat) आणि माकडांच्या माध्यमातून (Monkeys) कोरोना विषाणू पसरू शकतो, असं या अभ्यासातून लक्षात आलं आहे.

येत्या काळात उंदीर (Rat) आणि माकडांच्या माध्यमातून (Monkeys) कोरोना विषाणू पसरू शकतो, असं या अभ्यासातून लक्षात आलं आहे.

  मुंबई, 23 नोव्हेंबर: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रभाव हळूहळू कमी होत असताना आणखी एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी (Princeton University) आणि ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ अॅमेझॉन्स (Federal University of Amazons) यांनी केलेल्या अभ्यासातून सर्वांना चिंतेत टाकणारा एक इशारा देण्यात आला आहे. येत्या काळात उंदीर (Rat) आणि माकडांच्या माध्यमातून (Monkeys) कोरोना विषाणू पसरू शकतो, असं या अभ्यासातून लक्षात आलं आहे.

  न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधक मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट (Molecular Biologist) सीन किंग आणि कॉम्प्युटर साइंटिस्ट मोना सिंग (Mona Singh) यांनी वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचं जीनोमिक (Genomic) विश्लेषण केलं. यामध्ये विशेषत: सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) सारखे विषाणू सहजपणे अंतर्भूत करणाऱ्या जीवांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात आढळलं की, उंदरांच्या काही प्रजाती वारंवार सार्ससारख्या विषाणूंच्या संपर्कात आल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यात विशिष्ट स्तरापर्यंत विषाणू प्रतिरोधक क्षमता विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे संशोधन पीएलओएस कम्प्युटेशनल बायोलॉजी (PLOS Computational Biology) या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. 'आमच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, उंदरांना सार्ससारख्या कोरोना विषाणूची वारंवार लागण झाली होती,' असा स्पष्ट उल्लेख या शोधनिबंधात करण्यात आला आहे.

  संशोधनात काय समोर आलं?

  'शक्यतो या संसर्गामुळे उंदरांमध्ये सार्ससारख्या कोरोना विषाणूला सहन करण्याची किंवा प्रतिकार करण्याची शक्ती विकसित झाली आहे, असं संशोधकाचं म्हणणं आहे. डॉ. किंग आणि प्रोफेसर मोना सिंग यांनी ACE2 रिसेप्टर्सचा अभ्यास केला. या रिसेप्टर्सच्या मदतीनं सार्ससारखे विषाणू सस्तन प्राण्यांच्या पेशींमध्ये प्रवेश करतात. माणूस आणि सस्तन प्राणी यांच्या शरीरांत एसीई2 रिसेप्टर्स आढळल्याची संख्या फारच थोडकी आहे. जीनोमिक विश्लेषणात असं लक्षात आलं की उंदरांमध्ये एसीई 2 चा विकास वेगानं होत आहे.

  ब्राझीलच्या जंगलातील जीवाणूही (बॅक्टेरिया) धोकादायक

  ब्राझीलमधील मॅनॉस येथील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ अॅमेझॉन्सच्या (Federal University of Amazons) संशोधकांनी भीती व्यक्त केली आहे की, यावेळी ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये असलेल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे महामारी पसरू शकते. त्यांच्या मते, उंदीर आणि माकडांच्या माध्यमातून महामारीचा फैलाव होऊ शकतो. युनिव्हर्सिटीतील बायोलॉजिस्ट मार्सेलो गोर्डो (Marcelo Gordo) आणि त्यांच्या टीमला अलीकडेच एका कूलरमध्ये तीन पाईड टॅमरिन (Pied tamarin) माकडांचे कुजलेले मृतदेह सापडले. या कुलरचा वीजपुरवठा कोणीतरी बंद केला होता. त्यामुळं माकडांचे मृतदेह आतमध्येच कुजले. मार्सेलो आणि त्यांच्या टीमनं या माकडांच्या मृत शरीरातून संशोधनासाठी काही नमुने घेतले होते.

  युनिव्हर्सिटीतील आणखी एक बायोलॉजिस्ट अॅलेसेन्ड्रा नव्हा (Alessandra Nava) यांनी मार्सेला यांच्या टीमला मदत केली. त्यांनी माकडांच्या शरीरातून घेतलेल्या नमुन्यांमधून परजीवी जंत (parasitic worms), व्हायरस आणि इतर संसर्गजन्य घटक शोधले. मानव सातत्यानं जंगलांवर अतिक्रमण करत आहे. त्यामुळं त्यांच्या आणि जंगलातील सजीवांचा संपर्क येतो. या सजीवांच्या शरीरात असलेले व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅथोजेन्स मानवामध्ये सहज पसरत आहे, असं अॅलेसेन्ड्रा यांनी सांगितलं.

  दोन नामांकित युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी माकड आणि उंदीर येत्या काळात कोरोना प्रसारासाठी कारणीभूत ठरणार असल्याचं नमूद केलं आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

  First published:

  Tags: Coronavirus