Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाचा सौम्य संसर्ग असणाऱ्यांमध्ये तयार होतंय Antibody Protection, अभ्यासात आलं समोर

कोरोनाचा सौम्य संसर्ग असणाऱ्यांमध्ये तयार होतंय Antibody Protection, अभ्यासात आलं समोर

ज्या रुग्णांमध्ये कोरोना सौम्य (Mild Corona) प्रमाणात आढळून आला आहे,अशा रुग्णांच्या शरीरामध्ये प्रतिजैविक उत्पादक रोगप्रतिकार पेशी (Antibody Producing Immune Cells) विकसित झाल्या असून त्या आयुष्यभर टिकू शकतात

नवी दिल्ली, 26 मे: ज्या रुग्णांमध्ये कोरोना सौम्य (Mild Corona) प्रमाणात आढळून आला आहे,अशा रुग्णांच्या शरीरामध्ये प्रतिजैविक उत्पादक रोगप्रतिकार पेशी (Antibody Producing Immune Cells) विकसित झाल्या असून त्या आयुष्यभर टिकू शकतात. त्या विषाणूपासून संबंधित रुग्णाचे रक्षण करु शकतात,असं अमेरिकी संशोधकांना आढळून आलं आहे. अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असं आढळून आलं की विषाणू संसर्गादरम्यान अँटीबॉडी निर्माण करणाऱ्या रोगप्रतिकार पेशी वेगाने वाढतात  आणि रक्तात पसरतात, त्यामुळे शरीरातील अँटीबॉडीची पातळी उच्चतम होते. संसर्ग संपुष्टात आल्यानंतर यातील बहुतांश पेशी नष्ट होतात आणि रक्तातील अँटीबॉडीची (Antibody) पातळी कमी झाल्याचे दिसून येते. पण अँटीबॉडी तयार करणाऱ्या काही प्रमाणात पेशी ज्यांना दीर्घकालीन प्लाझ्मा पेशी ( long-lived Plasma Cells) म्हणतात,या अस्थिमज्जा म्हणजेच बोनमॅरो मध्ये (Bone Marrow) स्थलांतरित होऊन त्याठिकाणी स्थायिक होतात. पुन्हा विषाणू संसर्गापासून संरक्षण मिळावे यासाठी या पेशी रक्तात सातत्याने काही प्रमाणात प्रवाहित होत असतात. 'कोरोनाची प्रथम लक्षणे दिसल्यानंतर 11 महिन्यांनी आम्हाला संबंधित रुग्णांमध्ये अँटीबॉडी तयार करणाऱ्या पेशी आढळल्या. या पेशी रुग्ण जिवंत असे पर्यंत त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार करत असतात. दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्तीचा हा सबळ पुरावा म्हणता येईल', असे स्कूल ऑफ मेडिसीन विश्वविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक अली एलेबेडी यांनी सांगितलं. या छोट्या अभ्यासाचे निष्कर्ष नेचर जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहेत. हे वाचा-पुरुषांमध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोना लस घेणाऱ्या William Shakespeare यांचं निधन अभ्यासासाठी या पथकात 77 जण सहभागी झाले होते. या सहभागींना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून लागल्यानंतर एक महिन्यांनी त्यांच्या रक्तातील अँटीबॉडीज पातळी दर 3 महिन्यांनी तपासण्यात आली. या पथकाने प्राथमिक संसर्गाच्या 7 ते 8 महिन्यांनंतर या सहभागींपैकी 18 जणांच्या शरीरातून बोन मॅरो घेतला. त्यानंतर तुलनेकरिता शास्त्रज्ञांनी अशा 11 लोकांकडून देखील बोनमॅरो घेतला ज्यांना कधीही कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. या बोनमॅरो नमुन्यांपैकी कोरोनाचा संसर्ग झालेल्या 15 जणांच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण करणाऱ्या रोगप्रतिकार पेशींची निर्मिती झाल्याचं आढळून आलं. दुसऱ्यांना बोनमॅरो नमुने देण्यासाठी आलेल्या 5 रुग्णांमध्ये 4 महिन्यांनंतरही या पेशी कार्यरत असल्याचं दिसून आलं. कोरोनाचा संसर्ग झाला नसलेल्या 11 रुग्णांच्या बोनमॅरोमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही पेशींची निर्मिती झाली नसल्याचं आढळून आलं. 'कोरोनाचा सौम्य संसर्ग देखील रोगप्रतिकारक प्रतिक्रियेस कारणीभूत ठरु शकतो. यामुळे रोगप्रतिकार यंत्रणा उत्तेजित होऊ शकते. पेशींच्या मध्यस्थी मुळे अँटीबॉडीज शरीरात दिर्घकाळ तयार होऊ शकतात. खरं तर इम्युन रिस्पॉन्सला (Immune Response) चालना देत अँटीजेनला उत्तेजित करुन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच लसीचे मुख्य तत्व आहे.' हे वाचा-कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात होणार मृत्यू? काय आहे या VIRAL दाव्यामागचं सत्य आधी कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांना परत संसर्ग होण्याचे प्रमाण केवळ 2 टक्के म्हणजेच अगदी नगण्य असल्याचे गुरुग्राम येथील फोर्टीस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्युटमधील न्युरोलॉजी विभागाचे संचालक आणि प्रमुख प्रवीण गुप्ता यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले. या वस्तुस्थितीवर आधारित हर्ड इम्युनिटीचा सिध्दांत विकसित झाला असून,मोठ्या प्रमाणात लोकांना माईल्ड क्लिनिकल इन्फेक्शन झाले तर त्यांच्यात हर्ड इम्युनिटी (Heard Immunity) विकसित होऊ शकते, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona patient, Corona updates, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या