नवी दिल्ली, 28 मे : देशात कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे.अनेक राज्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध लागू आहेत. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लांब रांगा असल्याचं चित्रही पाहयला मिळत आहे. त्याचबरोबर लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी देखील अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व अडथळ्यानंतरही देशात डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ( Union Minister Prakash Javadekar) यांनी केला आहे. काय म्हणाले जावडेकर? जावडेकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोना संकट आणि कोरना लसीकरणाबाबत माहिती दिली. " देशातील लसीकरण यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Department) 216 कोटी लसीचे डोस उत्पादन करण्याबातचा रोडमॅप सादर केला आहे. यामध्ये देशातील आणि विदेशातील कोणत्या लस देण्यात येणार आहेत, याची देखील माहिती आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. अनेक राज्यातून कोरोना लसीचा तुटवडा असल्याचे वृत्त आले आहे. त्यावर लस उत्पादक कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. येत्या काळात यावर तोडगा निघेल, असा दावा त्यांनी केला.
#WATCH Vaccination in India will be completed before December 2021, says Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/WFTVj7pnmn
— ANI (@ANI) May 28, 2021
PM हे इव्हेंट मॅनेजर, त्यांची नौटंकीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत, राहुल गांधींची विखारी टीका जावडेकरांनी यावेळी कथित टूलकिट प्रकरणाचाही उल्लेख केला. राहुल गांधी यांची भाषा आणि कोरोनाबद्दल भीती निर्माण करण्याचा त्यांचा सुरु असलेला प्रयत्न पाहून टूलकिट प्रकरणात काँग्रेसचा हाथ असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे.