जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / लग्नघरावर शोककळा; 10 दिवसात दोन वेळा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, लग्नाच्या पूर्वसंध्येलाच मृत्यूने गाठलं

लग्नघरावर शोककळा; 10 दिवसात दोन वेळा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, लग्नाच्या पूर्वसंध्येलाच मृत्यूने गाठलं

लग्नघरावर शोककळा; 10 दिवसात दोन वेळा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, लग्नाच्या पूर्वसंध्येलाच मृत्यूने गाठलं

घरात लग्नाची तयारी सुरू होती. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वजण निश्चिंत झाले होते. मात्र त्या दिवशी…

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 30 एप्रिल : कर्नाटकमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे 32 वर्षाच्या तरुणाची प्रकृती अचानक खराब झाली. कुटुंबीयांची त्याची चाचणी केली. 10 दिवसात दोन वेळा त्याची चाचणी केली व ती निगेटिव्ह आली. बुधवारी त्याची प्रकृती इतकी खालावली की त्याला शिवमोगा येथील एका कोविड रुग्णालयात भरती करावं लागलं. येथेच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची तिसऱ्यांदा कोविड चाचणी करण्यात आली व तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तरुणाचं लग्न ठरलं होतं, आणि लग्नाच्या एक दिवसापूर्वीच त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिक्कमगलुरु येथे राहणारे पृथ्वीराज याचं लग्न 29 एप्रिल रोजी ठरवलं होतं. घरात लग्नाची तयारी सुरू होती. दोन आठवड्यांपूर्वी पृथ्वीराज लग्नासाठी बंगळुरूहून आपल्या घरी देवाराकोडिग येथे परतला होता. नवरदेव बंगळुरूमध्ये सेल्स एग्झिक्यूटिव्ह म्हणून काम करीत होता. त्याचे वडील मंजूनाथ व्यवसायाने शेतकरी आहेत. पृथ्वीराज हा त्यांचा मोठा मुलगा. मंजुनाथ यांनी सांगितलं की, बंगळुरूतून परतल्यानंतर मुलाचं पोट दुखू लागला होतं. त्यानंतर त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता**.** त्याला एका स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याची प्रकृती पाहून कुटुंबीयांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला होता. पृथ्वीची तब्येत बरी झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच दिवशी लग्न करण्याचं ठरवलं. हे ही वाचा- सोबत जगलो, सोबतच मरू; पत्नीच्या निधनानंतर अवघ्या 5 मिनिटांत पतीनंही सोडले प्राण दोन्ही कुटुंबीय लग्नाची तयारी करीत होते. पृथ्वी रुग्णालयात घरी आला होता. मात्र अचानक बुधवारी त्याला पुन्हा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला पुन्हा एका स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर शिवमोग्गा जिल्ह्यातील थिरथाहल्लीमध्ये पाठविण्यात आलं. दोन्ही रुग्णालयात त्याची चाचणी करण्यात आली आणि कोविड रिपोर्टही निगेटिव्ह आले. मात्र तरीही त्याची प्रकृती बिघडत होती. पृथ्वीराजला शिवमोग्गा येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. त्याला कोविड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आरोग्य अधिक्षक डॉ. श्रीधर यांनी सांगितलं की, पृथ्वीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी त्याने शेवटचा श्वास घेतला. मृत्यूनंतर त्याचा तिसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पृथ्वी याच्यावर कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आला. गुरुवारी जे लोक त्याच्या लग्नात सामील होण्यासाठी आले होते, ते त्याच्या अंत्यसंस्कारात सामील झाले. मात्र लांब उभं राहून त्यांनी मृतदेह पाहिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात