अखेर कोरोना लशीची प्रतीक्षा संपली! अदार पूनावालांनी सांगितलं कोणत्या महिन्यात येणार लस

अखेर कोरोना लशीची प्रतीक्षा संपली! अदार पूनावालांनी सांगितलं कोणत्या महिन्यात येणार लस

देशाची जमता कोरोना लशीच्या प्रतीक्षेत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे CEO अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी कोरोना व्हायरसच्या लशीबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अद्याप संकट टळलेलं नाही. गेल्या 7 महिन्यांपासून नागरिक कोरोनाच्या भीतीच्या छायेत जगत आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या अपेक्षेने कोरोना लशीकडे डोळे लावून बसले आहेत. त्यात कोरोनावायरस (Coronavirus) च्या लशीबाबत (COVID-19 Vaccine) पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण बाब स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, ते म्हणाले की एसआयआय निर्मित ऑक्सफर्ड कोरोनाव्हायरस लशीच्या 100 दशलक्ष डोसची पहिली तुकडी 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत उपलब्ध होईल. ऑक्सफर्डची कोरोना लस अत्यंत किफायतशीर होईल, असेही पूनावाला म्हणाले. पूनावाला म्हणाले, "आम्ही पहिल्यांदा 100 दशलक्ष डोस देण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहोत. ते 2021 च्या Q2-Q3 पर्यंत उपलब्ध होईल."

पूनावाला म्हणाले, "जर यूकेने आगाऊ चाचणी सुरू केली असेल आणि त्यांनी आमच्यासोबत आकडेवारी शेअर केली तर आपत्कालीन चाचण्यांसाठी आम्ही आरोग्य मंत्रालयाला अर्ज करू आणि तेथून ते मंजूर झाल्यास आम्हीसुद्धा हीच चाचणी भारतात करू शकू." जर हे सर्व यशस्वी झालं तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत आमच्याकडे ही लस उपलब्ध असेल. "

पूनावाला म्हणाले की, पुढचे आव्हान हे आहे, ज्याचा आपण सामना करावा लागणार आहे. या ट्विटच्या दुसर्‍याच दिवशी त्यांनी कोविड -19 लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लशीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: October 28, 2020, 5:16 PM IST

ताज्या बातम्या