मुंबई, 7 जून : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (coronavirus cases) मोठी घट पाहायला मिळत आहे. 7 जून रोजी राज्यात 12,557 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आज ही संख्या अधिक कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. आज राज्यात 10 हजार 291 रुग्णांची नोंद करण्यात आली असून 7 जूनला ही संख्या 12,557 इतकी होती. (coronavirus cases)
आज राज्यात मृतांचा आकडा 154 पर्यंत पोहोचला असून राज्यात मृत्युदराचं प्रमाण 1.72 टक्के इतके आहे. चांगली बाब म्हणजे आज 21 हजार 81 रुग्ण बरे झाले असून घरी परतले आहे. यावरुन नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. सध्या राज्यात 1 लाख 74 हजार रुग्ण सक्रिय आहेत. (corona updates)
पुणे कोरोना update
पुण्यात आज 177 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 514 जणांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या पुण्यात 3943 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. 21 जूनपासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध केली जाणार आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी यासाठी इतर देशांशी बातचीत सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून थोडे अधिक नवे रुग्ण आढळून आले. तर 2427 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. रविवारी दिवसभरात 1 लाख 74 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर 61 दिवसांनंतर रविवारी एवढे कमी नवे रुग्ण देशात आढळून आलेत. (Covid-19 Latest Updates Today)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.