कलकत्ता, 10 जुलै : ग्लोबल स्टील टायकून आणि लक्ष्मी निवास मित्तल म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी सुमारे 3300 कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. मित्तल परिवाराने ही रक्कम ऑक्सफोर्ड विद्यापीठातील लसीकरण विभागाला दिली आहे.
विभाग जेनर इन्स्टिट्यूअंतर्गत येतो आणि त्याचे संचालक प्रोफेसर अॅड्रियन हिल आहेत. आता या विभागाचे नाव बदलून 'लक्ष्मी मित्तल अन्ड फॅमिली प्रोफेसरशीप ऑफ वॅक्सीनोलॉजी' असे केले जाईल. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या विकास कार्यालयाने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे.
जगातील सर्वोत्कृष्ट लस संस्था
लसीच्या अभ्यासासाठी जेनर संस्था जगातील सर्वोत्कृष्ट संस्था मानली जाते. संस्था कोविड - 19 ची लस तयार करण्यामध्ये व्यस्त आहे. हे आता जगातील सर्वात मोठे शैक्षणिक लस केंद्र बनले आहे. सध्या या संस्थेने विकसित केलेली मानवी चाचणी (कोविड -19 व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायल) लस युनायटेड किंगडम, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे.
हे वाचा-महाराष्ट्रात नव्या रुग्णांची संख्या गेली 7000 वर; Coronavirus चे Latest अपडेट्स
लक्ष्मी मित्तल काय म्हणाले?
या अहवालात आर्सेलर मित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांच्या वतीने लिहिण्यात आले आहे की, "हे वर्ष संपूर्ण जगासाठी वेकअप कॉल आहे. जेणेकरुन आपण भविष्यासाठी स्वतःला तयार करू शकू." साथीच्या रोगामुळे सर्व देशभर किंवा खंडभर सामाजिक आणि आर्थिक नुकसान कसे होऊ शकते हे आपल्या सर्वांनाच कळले आहे. ते पुढे म्हणाले की, मला नेहमीच आरोग्य सेवेत विशेष रस होता. प्रत्येकाप्रमाणे मी कोविड -19 या लसीद्वारे होत असलेल्या कामाकडेही पहात होतो.