बांग्लादेशमधील ढाक्याच्या येल विद्यापीठात मास्कच्या परिणामकारकतेवर संशोधन करण्यात आलं. याबाबतचा अभ्यास नुकतान वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
हा अभ्यास ‘गोल्ड स्टँडर्ट’चा असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. सर्जिकल मास्क हा कापडाच्या मास्कपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं आहे.
या मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही. त्यामुळे वारंवार हा मास्क चेहऱ्यावरून काढला जाण्याची शक्यता कमी होत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
बांग्लादेशमधील 600 गावांमध्ये संशोधन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या गावांतील 3 लाख 42 हजार नागरिकांवर प्रयोग केल्यानंतर शास्त्रज्ञांनी सर्जिकल मास्क सर्वात प्रभावी असल्याचं म्हटलं आहे.
या निष्कर्षावर अद्याप वैज्ञानिकांनी अंतिम मोहोर उमटवणं बाकी आहे. याचा ‘पिअर रिव्ह्यू’ झाल्यानंतरच हा अभ्यास सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार आहे.