नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: गेल्या दोन महिन्यांपासून भारतात (corona in India) कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) शिगेला पोहोचली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये (New Corona Patients) घट होत आहे. दरम्यान संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, (Maharashtra) दिल्ली (Delhi) आणि पश्चिम बंगालसह (West Bengal) अनेक राज्यांनी त्यांच्या सक्रिय (Corona Active case) केसलोडमध्ये घट नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तर इतरांमध्ये केसेसमध्ये वाढ होत आहे. भारतातील सक्रिय (COVID-19) संख्या आता 14.35 लाखांवर घसरली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे.
ICMR चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवीन रुग्णांची संख्या मूळ पातळीपर्यंत खाली येईल. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितलं की, महामारीची तिसरी लाट मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात येईल.
जोरदार भूकंपाचे धक्के; 5.7 रिश्टर स्केल तीव्रता, लोकं पडले घराबाहेर
दैनंदिन प्रकरणांच्या आकडेवारीचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितलं की, मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये संसर्गाची संख्या कमी होत चालली आहे, तरीही रुग्णांची संख्या दररोज सुमारे 48,000 (काही आठवड्यांपूर्वी) वरून सध्या 15 हजारांपर्यंत घसरली आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितली महाराष्ट्राची स्थिती
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करेल. दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली. दरम्यान काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केली जाईल.
12-15 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 15,252 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी या संसर्गामुळे 75 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात ओमायक्रॉन प्रकाराचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत राज्यात एकूण 3,334 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. ताज्या आकडेवारीनंतर आता राज्यात एकूण 77,68,800 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1,42,859 जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
याशिवाय 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची मागणीही टोपे यांनी केली. ते म्हणाले, केंद्राने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरू करावी. त्यांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आरोग्य पायाभूत सुविधांसह सज्ज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Covid cases, Wave