दिल्ली आणि पुण्याची R-Valueदेखील 1 पेक्षा कमी आहे. महाराष्ट्र आणि केरळमधील R-Value देखील 1 पेक्षा कमी नोंदवण्यात आल्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा आकडा 1.17 एवढा नोंदवण्यात आला होता. 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीत तो 1.11 पर्यंत खाली आला आणि आता तो एकपेक्षाही खाली आला आहे.
मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांमधील R-Value मात्र 1 पेक्षा जास्त आहे. मुंबईत 1.09, चेन्नईत 1.11, बंगळुरुमध्ये 1.06 तर कोलकात्यात 1.04 इतकी R-Value नोंदवली गेली आहे.
एक व्यक्ती किती व्यक्तींपर्यंत इन्फेक्शन पोहोचवते, हे नोंदवण्यासाठी ‘R’ हे एकक वापरलं जातं. कोरोना विषाणू पसरण्याचा वेग किती आहे, हे यावरून दिसून येतं. जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कळस गाठला होता, तेव्हा देशाची R-Value ही 1.37 इतकी नोंदवली गेली होती.