मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

शरीरात शिरण्यापूर्वीच Corona होतो निकामी; पुण्याच्या कंपनीने तयार केला भन्नाट AntiViral मास्क

शरीरात शिरण्यापूर्वीच Corona होतो निकामी; पुण्याच्या कंपनीने तयार केला भन्नाट AntiViral मास्क

पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजीज या कंपनीनं अँटी व्हायरल मास्कची निर्मिती केली आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोनाचा विषाणू निकामी होत असल्याचा दावा संस्थेनं केला आहे.

पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजीज या कंपनीनं अँटी व्हायरल मास्कची निर्मिती केली आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोनाचा विषाणू निकामी होत असल्याचा दावा संस्थेनं केला आहे.

पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजीज या कंपनीनं अँटी व्हायरल मास्कची निर्मिती केली आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोनाचा विषाणू निकामी होत असल्याचा दावा संस्थेनं केला आहे.

  • Published by:  desk news

पुणे, 30 जून : पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजीज (Thincr Technologies) या कंपनीनं अँटी व्हायरल मास्कची (Anti Viral Mask) निर्मिती केली आहे. हे विशिष्ट तंत्र वापरून तयार केलेले एन-95 मास्क (N-95 Mask) असून त्यांच्याभोवती अँटी-व्हायरस कोटिंग (Anti-viral coating) लावण्यात आल्यामुळं या मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रिय (Inactive) होत असल्याचं सिद्ध झालं आहे. गेल्या दोन महिन्यात या प्रकारचे 10 हजार मास्क कंपनीनं विकले असून विविध सरकारी हॉस्पिटल्स आणि कार्यालयांमध्ये त्याचा पुरवठा सुरू आहे.

काय आहे फॉर्म्युला?

हे मास्क तयार करताना नेहमीच्या एन-95 मास्कवरच एक अतिरिक्त कापडी पट्टी लावण्यात येते. ही पट्टी अँटी-व्हायरल घटकांची प्रक्रिया केलेली असते. ही पट्टी म्हणजे एक प्रकारे कोरोना विषाणूंचं जाळं ठरतं. हवेतून जर कोरोनाचा विषाणू चेहऱ्याकडे आला, तर या मास्कच्या संपर्कात येतात अँटी-व्हायरल पट्टीच्या प्रभावाने तो निष्क्रिय होतो. या मास्कवरील पट्टीत वापरण्यात येणारे केमिकल्स हे कोरोना व्हायरसमध्ये प्रवेश करतात आणि पेशींमध्ये शिरकाव करण्याची त्याची क्षमताच संपवून टाकतात. एकदा व्हायरसची इन्फेक्शन करण्याची क्षमता संपली, की तो व्हायरस धोकादायक राहत नाही, अशी माहिती थिंकर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक अध्यक्ष शीतलकुमार झंबाड यांनी दिली आहे.

या मास्कला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळानेदेखील मान्यता दिली आहे. नवी मुंबईच्या नेरूळमधील प्रयोगशाळेत हा शोध लावण्यात आला आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सहकार्यामुलं हे संशोधन शक्य झाल्याची माहिती झंबाड यांनी दिली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर मास्क हाच कोरोना रोखण्यावरचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं दिसत होतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून हाच मास्क अधिक प्रभावी आणि परिणामकारक कसा बनवता येईल, यावर आमचा विचार सुरू होता. त्यातूनच हा अँटी-व्हायरल मास्क बनवण्याची कल्पना सुचली आणि एका वर्षात ही कल्पना प्रत्यक्षात आली, असं झंबाड यांनी सांगितलं आहे.

दोन प्रकारचे मास्क

यातील मूळ अँटि-व्हायरल मास्क हा एकदाच वापरून फेकून देण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आला आहे. तर थ्री-डी फिल्टर मास्क हा वर्षभर वापरता येतो, असा दावा कंपनीनं केला आहे. हे दोन्ही मास्क परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार असून लवकरच त्यांची बाजारातील किंमत जाहीर करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mask, Pune (City/Town/Village)