दमास्कस, 21 डिसेंबर : कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) लढा देण्यासाठी जगभरात नवीन लस सुरू केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी लशीची निर्मिती शेवटच्या टप्प्यात आहे. ज्यामुळे लोकांचा जीव वाचण्याची शक्यता वाढली आहे. परंतू जगातील काही भागात कोरोना लशीबाबत (CoronaVaccine) अफवा पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. असे म्हटले जाते की, या लशीमुळे वंध्यत्व, डीएनएमधील गोंधळाशिवाय मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होईल. उत्तर-पश्चिम सीरियाच्या सुन्नी मुस्लिमबहुल भागात या चुकीच्या बातम्यांचा पूर आला आहे. जर यावर नियंत्रण आणले नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतील.
सामाजिक कार्यकर्ता आणि डॉक्टर समजावण्यात गुंतले
उत्तर-पश्चिम सीरिजामध्ये अनेक डॉक्टर, मानवतावादी आणि सहाय्यक कार्यकर्त्यांनी मीडियाला सांगितलं की, सीरियामधील बंडखोरांच्या भागातही सर्वसामान्य नागरिकांना हा विषाणू प्रत्यक्षात खूप धोकादायक आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एक सीरियन विरोधी एनजीओचे सहायता समन्वय युनिटच्या लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मोहम्मद सालेम म्हणतात की, ज्यांनी आपल्या मुलांचा मृत्यू आणि त्यांचे कुटुंब नष्ट होताना पाहिले आहे. त्यांच्यासाठी या विषाणूवर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही स्वयंसेवी संस्था उत्तर-पश्चिम सीरियामधील कोरोनाव्हायरस परिस्थितीविषयीच्या काही विश्वसनीय स्त्रोतांपैकी एक आहे.
समाजातील प्रमुख लोकांकडून पसरवली जातेय अफवा
समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांकडून कोणत्याही आधाराशिवाय अनेक दावे सादर करीत आहे. येथील एक स्वयंघोषित राजकीय शोधकर्त्याने आपल्या 98000 फॉलोअर्सना सांगितलं की, जर हा व्हायरस त्यांना मारू शकली नाही तर त्याची लस त्यांना नक्की मारेल. सीरिजायातील एक शहर इडलिबमध्ये व्हॉट्सअॅपवर एक संदेश व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अमेरिकेतील एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या लीक झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या हवाल्याने हे सांगण्यात आलं की, हा व्हायरस पृथ्वीवरील लोकसंख्या कमी करण्याची योजना आहे. याशिवाय असं ही म्हटलं की, जर कोरोनामुळे लोकसंख्या कमी झाली नाही तर लशीमुळे निश्चितपणे त्यांचा मृत्यू होईल.