मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus New Variant in India : दिवाळीत महाराष्ट्रात फुटणार 'कोरोना बॉम्ब'; पुण्यात नव्या व्हेरिएंटची एंट्री, Alert जारी

Coronavirus New Variant in India : दिवाळीत महाराष्ट्रात फुटणार 'कोरोना बॉम्ब'; पुण्यात नव्या व्हेरिएंटची एंट्री, Alert जारी

दिवाळीत कोरोनाचा धोका

दिवाळीत कोरोनाचा धोका

दिवाळीआधी राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाची प्रकरणं वाढल्याचं समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 18 ऑक्टोबर : गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणासुदीचा काळ घऱातच गेला. त्यामुळे यावर्षी सण साजरे करण्याचा उत्साह अधिकच आहे. गणेशोत्सवानंतर यंदाची दिवाळीही धूमधडाक्यात कऱण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. हिवाळा, सणवार त्यात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेने धास्ती घेतली आहे. दिवाळीत कोरोना ब्लास्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने अलर्टही जारी केला आहे.

दिवाळीआधी कोरोना पुन्हा हातपाय पसरायला लागला आहे. कोरोनाने आता आपलं खतरनाक रूप दाखवायला सुरुवात केली आहे.  देशात कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट BF.7 ने शिरकाव केला आहे.. चीनमध्ये आढळेलला ओमिक्रॉनचा हा सब व्हेरिएंट भारतात आढळल्याने कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या व्हेरिएटंचं पहिलं प्रकरण सापडल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी बैठक घेतली. कोरोनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हे वाचा - शरीरातल्या अँटीबॉडीजना चकवा देतोय कोरोनाचा नवा व्हॅरिएंट; नवीन रिपोर्टने खळबळ

दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढत आहेत. सोमवारी पुण्यात BQ.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. भारतातील हे पहिलं प्रकरण आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार BQ.1, BQ.1.1 हे व्हेरिएंट BA.5 व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट आहेत. हे खूप खतरनाक आहेत. कारण कोरोनाविरोधातील इम्युनिटीलाही चकवा देत आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना प्रकरणांमध्ये  17.7% वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासाठी कोरोनाचा BF.7 आणि  XBB व्हेरिएंट जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वयस्कर आणि इतर आजारांनी ग्रस्त असेलल्यांसाठी जास्त धोकादायक ठरू शकतो, असं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - ताप डेंग्यूचा आहे की साधा? लक्षणांमधील या फरकांवरून सहज ओळखा येतं

राज्याचे आरोग्य तज्ज्ञ प्रदीप आवडे यांनी सांगितलं की, सध्या ही प्रकरणं ठाणे, रायगड, मुंबईपुरती मर्यादिक आहेत. सणासुदीचा काळ लक्षात घेता प्रकरणं वाढू शकतात.

सर्वाधिक धोका असलेल्यांनी काळजी घ्यायला हवी. फ्लूसारख्या लक्षणंकडे दुर्लक्ष नको, अशी लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जा.कोरोना नियमांचं पालन करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

BF.7 सबव्हेरिएंटची लक्षणं

सतत खोकला येणे

छातीत वेदना

थरथरल्यासारखं वाटणं

वासाची क्षमता गमावणं

First published:

Tags: Coronavirus, Health, Lifestyle