जिनिव्हा, 07 जुलै : भारतासह जगभरात कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहेत. त्यात भारतात BA.2.75 हा ओमिक्रॉनचा नवा सब-व्हेरिएंट आढळला आहे (Omicron BA.2.75 variant in India). याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिला आहे. जगातील सर्वाधिक रुग्ण भारतात आणि भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच असल्याने आता चिंता अधिक वाढली आहे (WHO Alert about BA.2.75).
कोरोनाबाबत WHO ने पत्रकार परिषद घेतली. यात डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसियस यांनी भारत आणि इतर देशांमध्ये कोरोनाचा BA.2.75 हा नवा व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली.
घेब्रेसियस म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांत जगभरातील कोरोनाच्या नव्या प्रकरणात जवळपास 30 टक्के वाढ झाली आहे. डब्ल्यूएचओच्या सहा उपक्षेत्रांपैकी चार उपक्षेत्रात गेल्या आठवड्यात प्रकरणं वाढली आहेत. युरोप आणि अमेरिकेत BA.4 आणि BA.5 मुळे कोरोनाची लाट आली आहे. तर भारतासारख्या देशात BA.2.75 या नव्या सब-व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
हे वाचा - Corona Precaution Dose साठी आता 9 महिने प्रतीक्षेची गरज नाही; मोदी सरकारने केला महत्त्वाचा बदल
डब्ल्यूएचओच्या सौम्या स्वामिनाथन यांनीही ट्विटवर एक व्हिडीओ पोस्ट करत या नव्या उपप्रकाराबाबत माहिती दिली आहे. हा सर्वात आधी भारतात आढळला त्यानंतर इतर 10 देशांमध्ये आढळल्याचं त्या म्हणाल्या. याच्या स्पाइक प्रोटिनमध्ये बदल झाल्याचं दिसतं आहे. पण याबाबत अधिक काही सांगणं आता घाईचं ठरेल.
Weekly @WHO media briefing on #COVID19 and other global health issues https://t.co/9m4GLectpE
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) July 6, 2022
इज्राइलमधील डॉ. शाय फ्लेशॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह 10 राज्यांत प्रकरणं आढळली असून एकूण 69 रुग्ण आहेत. सर्वाधिक 27 रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 13, कर्नाटकात 10, हरयाणात 6, मध्य प्रदेशात 5, हिमाचल प्रदेशात 3, तेलंगणात 2, दिल्ली-जम्मू आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक रुग्ण आहे. याबाबत अद्याप भारत सरकारकडून काही माहिती आली नाही.
हे वाचा - 'चीन नव्हे तर या देशातून आला कोरोना'; व्हायरसच्या स्रोताबाबत नवा खळबळजनक दावा
भारतासह हा व्हेरिएंट आणखी काही देशात आहेत. यूकेमध्ये 6, जर्मनी-कॅनडा-यूएसमध्ये प्रत्येकी 2 आणि जपान-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Who