नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: देशातील कोविडशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (Glenmark Pharmaceuticals Limited) सर्व वयस्कर कोविड रुग्णांसाठी नायट्रिक ऑक्साइड नावाचा नेझल स्प्रे (Nasal Spray) लॉन्च केला आहे. न्यूज एजन्सी ANI नुसार, ग्लेनमार्कने कॅनेडियन कंपनी सॅनोटाईझच्या सहकार्यानं हे तयार केलं आहे. फॅबिस्प्रे ब्रँड अंतर्गत नायट्रिक ऑक्साइड भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नेझल स्प्रेसाठी कंपनीला औषध नियामकाकडून उत्पादन आणि मार्केटिंगसाठी मान्यता मिळाली आहे. ग्लेनमार्कला देशाचे औषध नियामक, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून नायट्रिक ऑक्साईड नासल स्प्रे एक्सीलरेटेड अप्रूवल प्रक्रियेच्या उत्पादन आणि विपणनासाठी वेगवान मान्यता मिळाली आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे कि, नेझल स्प्रेने भारतातील फेज III चाचण्यांचे प्रमुख अंतिम बिंदू पूर्ण केले आहेत आणि 24 तासांत व्हायरल लोडमध्ये 94 टक्के आणि 48 तासांत 99 टक्के घट यशस्वीपणे दाखवली आहे. नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे (NONS) चाचण्यांदरम्यान COVID-19 रूग्णांमध्ये सुरक्षित आणि सहनशील असल्याचं आढळून आले. ग्लेनमार्क त्याचे FabiSpray या ब्रँड नावाने विक्री करेल. हे नेझल स्प्रे चाचणीत प्रभावी आढळलं कंपनीचे म्हणणं आहे कि, हा नायट्रिक ऑक्साईड आधारित नाकातील स्प्रे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्याचे काम करतो. चाचण्यांदरम्यान असं दिसून आलं कि, ते कोविड नष्ट करण्यात प्रभावी आहे आणि त्याच्या औषधाच्या सूक्ष्मजीव गुणधर्मांनी हे सिद्ध केले आहे कि जेव्हा हे स्प्रे मायक्रोबियलवर फवारले जाते तेव्हा ते शरीरात विषाणू वाढण्यास रोखते. ग्लेनमार्कनं कोविडच्या बाबतीत स्प्रेचे एक प्रभावी उपचार म्हणून वर्णन केले आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ रॉबर्ट क्रोकार्ट म्हणाले, आम्हाला खात्री आहे कि रुग्णांना आवश्यक आणि वेळेवर उपचार प्रदान करण्यात हे खूप पुढे जाईल. कोविड साथीच्या विरोधात भारताच्या लढाईत कंपनी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. सॅनोटीझसह (SaNOtize) भारतात लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.