• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • मुंबईत सुरु झालं पहिलं ड्राइव्ह लसीकरण केंद्र; आनंद महिंद्रा यांनीही केलं कौतुक

मुंबईत सुरु झालं पहिलं ड्राइव्ह लसीकरण केंद्र; आनंद महिंद्रा यांनीही केलं कौतुक

ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्तींचे मोठे हाल होत आहेत.या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पहिलं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र (Drive In Vaccination Center)सुरू केलं आहे.

 • Share this:
  मुंबई 6 मे: कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने संपूर्ण देशभर पसरलेली आहे. या भयानक संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी केवळ लसीकरण हाच उपाय असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लशींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी हे काळजीचे विषयआहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्तींचे मोठे हाल होत आहेत.या पार्श्वभूमीवरबृहन्मुंबई महानगरपालिकेने पहिलं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र (Drive In Vaccination Center)सुरू केलं आहे. दादरच्या (पश्चिम) जे. के. सावंत मार्गावर कोहिनूर टॉवरच्या पार्किंग लॉटमध्ये मंगळवारी (4मे) या लसीकरण केंद्राचं उद्घाटन झालं. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) आणि विकलांग व्यक्तींना (Disabled) रांगेत उभं राहावं न लागता त्यांच्या गाडीत बसूनच लस घेता आली. पहिल्यादिवशी417जणांनी या केंद्रावर लस घेतली. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रांवर रांगेत उभं राहावं लागत होतं. तसंचहेलपाटेही मारावे लागत होते. त्यामुळे ड्राइव्ह इन प्रकारच्या लसीकरण केंद्राचं अनेकांनीस्वागत केलं आहे. उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रायांनीही या कल्पनेचं स्वागत केलं आहे. पहिल्या दिवशी या ड्राइव्ह इनकेंद्रावर लोकांनी कशा प्रकारे लस घेतलीयाचा व्हिडिओ आनंद महिंद्रा(Anand Mahindra)यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. याड्राइव्ह इन लसीकरण केंद्रावर दोन बूथ उभारण्यात आले असून,दोन्ही ठिकाणीएका वेळी लसीकरणासाठी50वाहनं रांगेत थांबू शकतात. तसंच लस घेतल्यानंतरकाही काळ निरीक्षणाखाली थांबावं लागतं,त्यासाठी100वाहनांना पार्किंगकरून थांबता येणं शक्य आहे. एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर काही साइडइफेक्ट जाणवले,तर गाडीचा हॉर्न वाजवल्यास संबंधिताकडे नर्स किंवा डॉक्टरलक्ष देतील,अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रावर आठडॉक्टर्स आणि18नर्सेसची नियुक्ती करण्यात आली आहे. लशींचा पुरेसा साठाउपलब्ध असेल,तर दिवसाला पाच हजार लोकांचं लसीकरण या केंद्राद्वारे होऊशकतं,असं अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या केंद्रावरच्या लसीकरण व्हिडिओसोबत महापालिकेचं (BMC)कौतुक केलं आहे. तसंच पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल(Iqbal Singh Chahal)यांचंही प्रभावी उपाययोजनेबद्दल कौतुक केलं आहे. आनंदमहिंद्रा यांनी हा व्हिडिओ पाच मे रोजी शेअर केल्यापासून आतापर्यंत एक लाख60हजारांहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले असून, 7300हून अधिक जणांनी तोलाइक केला आहे.803जणांनी व्हिडिओ रिट्विट केला असून, 206 कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडिओवरच्या कमेंटमध्ये अनेकांनी आपल्या शहरातही अशीसुविधा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बेंगळुरूतल्या,तसंचदिल्लीतल्या युझर्सनी आपल्या राज्यातही अशी सुविधा सुरू करण्याची अपेक्षाव्यक्त केली आहे. एका युझरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाटॅग करून तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेकांनी यावर टीकाही केलीआहे. अनेक केंद्रं असूनही बहुतांश नागरिकांना ऑनलाइन अपॉइंटमेंट्स मिळतनाहीयेत,याकडे काही जणांनी लक्ष वेधलं. तसंच,मुंबईच्या नागरिकांनासुरक्षितपणे लस घेता येण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी महिंद्रायांनीही पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षाही काही जणांनी व्यक्त केली. ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उघड्या,मोकळ्या जागेत असायला हवं,अशी अपेक्षा एका युझरने व्यक्त केली आहे. 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने आतापर्यंत135हून अधिक लसीकरण केंद्रं सुरू केली आहेत. चार मे रोजी सायंकाळपर्यंत 24 लाख 86 हजार 827 डोस देऊन झाले असल्याचं महापालिकेची आकडेवारी सांगते.
  First published: