नवी दिल्ली, 6 मार्च : देशभरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेली ताजी आकडेवारी सर्वांची धडकी भरवणारी आहे. या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या 1,11, 92, 088 इतकी झाली आहे. काळजीची बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 18, 327 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 108 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ही गेल्या 36 दिवसांमधील सर्वात मोठी वाढ आहे. सलग चौथ्या दिवशी उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. India reports 18,327 new #COVID19 cases, 14,234 discharges and 108 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry Total cases: 1,11,92,088 Total discharges: 1,08,54,128 Death toll: 1,57,656 Active cases: 1,80,304 Total vaccination: 1,94,97,704 pic.twitter.com/9X3a7jwxth — ANI (@ANI) March 6, 2021 महाराष्ट्रात सर्वात मोठी संख्या देशातील एकूण रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 05 मार्चला दिवसभरात तब्बल 10 हजार 216 रुग्ण सापडले आहेत. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत ते मुंबई आणि नागपुरात. दोन्ही ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई आणि नागपुरात अनुक्रमे 1,174 आणि 1,225 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांचा विचार करता पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत तर त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि मुंबईचा नंबर लागतो. पुण्यात 18 हजार तर नागपुरात 11 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबई-ठाण्यात 9 हजार रुग्ण आहेत. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग वाढला कोरोनाचा धोका वाढलेला असतानाच देशातील कोरोना लसीकरणाचा (corona vaccination) वेग वाढला आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा एक मार्चपासून सुरु झाला आहे. यामध्ये 60 वर्षांवरील सर्व नागरिक आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. संपूर्ण देशात आत्तापर्यंत 1, 94, 97, 704 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.