मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Mask mandatory rules in Maharashtra : गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली; अखेर नव्या वर्षात घेता येणार मोकळा श्वास

Mask mandatory rules in Maharashtra : गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली; अखेर नव्या वर्षात घेता येणार मोकळा श्वास

Mask mandatory rules in Maharashtra : आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.

Mask mandatory rules in Maharashtra : आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.

Mask mandatory rules in Maharashtra : आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.

मुंबई, 31 मार्च : कोरोना महासाथीचं थैमान अद्यापही संपलेलं नाही. पण तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कोरोना निर्बंधही हळूहळू शिथील करण्यात आले (Maharashtra new corona guidelines). पण चेहऱ्यावरील मास्क काही हटला नाही. काही प्रमाणात सूट देण्यात आली तरी मास्क बंधनकारक होते (Mask mandatory rules in Maharashtra). त्यामुळे या मास्कपासून सुटका कधी मिळणार असंच सर्वांना वाटत होतं. अखेर तो दिवस आला. गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली आहे.

ज्याची प्रतीक्षा सर्वांना होती, ती बातमी नववर्षाच्या आधीच आली आहे. गुढीपाडव्याआधी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांची मास्कमुळे होणारी कोंडीही सोडवली आहे. नागरिकांना मास्क फ्री करून राज्य सरकारने नागरिकांना नववर्षाचं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा - Gudi Padwa 2022: 'गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे पण...' मुख्यमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं आवाहन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, "आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता मास्कही बंधनकारक नाही पण ऐच्छिक आहे. याचा अर्थ आता मास्क वापरणं बंधनकारक नाही. मास्क ऐच्छिक आहे". म्हणजे मास्क वापरायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. मास्क वापरण्यासाठी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हे निर्बंध उद्यापासून हटवण्यात येणार आहेत. उद्यापासून हे निर्बंध हटवण्यात आल्याने 2 एप्रिल 2022 रोजी येणारा गुढीपाडवा यंदा उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे वाचा - Gudi Padwa 2022: राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, यंदा निर्बंधमुक्त साजरा होणार गुढीपाडवा

राज्य सरकारकडून अधिकृत पत्रक काढून या संदर्भात माहिती देण्यात येईल, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Face Mask, Maharashtra News, Mask