नवी दिल्ली, 28 एप्रिल: केंद्र सरकार (Central government) लवकरच अँटी-कोविड-19 (Anti covid-19) लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील (Booster Dose) अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) द्वारे कोविड-19 विरोधी लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामधील अंतर कमी करण्यासाठी शिफारस करणं अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सरकार लवकरच अँटी-कोविड-19 लसीच्या दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर चालू 9 महिन्यांपासून 6 महिन्यांपर्यंत कमी करू शकते. सूत्रांनी सांगितले की लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) ही तफावत कमी करण्यासाठी शिफारस करू शकते, ज्याची बैठक 29 एप्रिल रोजी होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लसीच्या दोन्ही डोससह प्रारंभिक लसीकरण केल्यानं सुमारे 6 महिन्यांनंतर अॅटीबॉडीजची पातळी कमी होते आणि बूस्टर डोससह प्रतिकारशक्ती वाढते. कालावधी 6 महिने करण्याची शक्यता सध्या 18 वर्षांवरील सर्व लोक लसीच्या तिसऱ्या डोससाठी म्हणजे बूस्टर डोससाठी दुसरा डोस मिळाल्यानंतर नऊ महिन्यांनंतर पात्र आहेत. या घडामोडीच्या जवळच्या एका सूत्रानं सांगितले की, वैज्ञानिक पुरावे आणि येथे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या अभ्यासाचे निकाल पाहिल्यानंतर कोविड-19 लसीचा दुसरा आणि बूस्टर डोसमधील अंतर चालू नऊ महिन्यांवरून कमी करून सहा केले जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी NTAGI बैठकीत शिफारस केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. अनेक आरोग्य तज्ज्ञ दोन बूस्टर डोसमधील 9 महिन्यांच्या अंतराचा विचार करत नव्हते. दोन बूस्टर डोसमधील कालावधी कमी करण्याची आरोग्य तज्ज्ञांची मागणी होती. ते म्हणाले की, अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, कोरोना लसीमुळे प्रतिकारशक्तीचा प्रभाव सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे नऊ महिन्यांच्या अंतराचं कोणतंही औचित्य नाही.
10 जानेवारीपासून केंद्र सरकारनं आरोग्य सेवेत गुंतलेल्या कामगारांना लसींचे बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. मार्चमध्ये सरकारने 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला बूस्टर डोससाठी पात्र केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 18 ते 59 वयोगटातील लोकांना कोविड-19 लसीचे 5,17,547 बूस्टर डोस देण्यात आले आहेत. अनेक देशांमध्ये तीन महिन्यांचे अंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील वायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी सांगितले की, महामारीच्या काळात नवीन व्हेरिएंट आणि रोगप्रतिकारशक्ती यांच्यात नियमितपणे समतोल राखणं महत्त्वाचं असते. म्हणून बूस्टर डोस दरम्यान सहा महिन्यांचा अंतर कदाचित सर्वोत्तम आहे. ते म्हणाले की, रोगप्रतिकारक शक्तीचे चांगले उत्पादन व्हावे यासाठी दीर्घ कालावधी ठेवला जातो. मात्र आता आपल्याला माहित आहे की सहा महिन्यांपासून केवळ कोरोनाविरूद्ध अॅटीबॉडीज कमकुवत होऊ लागतात. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये, बूस्टर डोसमधील अंतर सहा महिन्यांपेक्षा कमी आहे. यूएसमध्ये दोन बूस्टर डोसमध्ये 5 महिन्यांचे अंतर आहे, तर यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये फक्त तीन महिन्यांचे अंतर आहे.