मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /या शहरात कोरोना लस कंपल्सरी! घरं हुडकून दारात येऊन देणार आता Vaccine

या शहरात कोरोना लस कंपल्सरी! घरं हुडकून दारात येऊन देणार आता Vaccine

 शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं (100 percent vaccination) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नागरिकांना (citizens) शोधून शोधून लसीकरण (vaccination) केलं जाणार आहे.

शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं (100 percent vaccination) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नागरिकांना (citizens) शोधून शोधून लसीकरण (vaccination) केलं जाणार आहे.

शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं (100 percent vaccination) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नागरिकांना (citizens) शोधून शोधून लसीकरण (vaccination) केलं जाणार आहे.

इंदूर, 24 ऑगस्ट : शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं (100 percent vaccination) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नागरिकांना (citizens) शोधून शोधून लसीकरण (vaccination) केलं जाणार आहे. ही योजना आखली आहे इंदूरच्या (Indore administration) प्रशासनानं. इंदूरमध्ये बुधवारपासून लसीकरणाचं महाअभियान (corona vaccination campaign) या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये शहरातील आणि ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात येईल आणि त्यांना शोधून त्यांचं लसीकरण केलं जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात अनोखा विक्रम

इंदूर शहरानं या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 95 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 27 टक्के नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. जिल्ह्यातील सर्व वॉर्ड आणि ग्रामपंचायती यांच्या आपातकालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन विक्रमी लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य केलं आहे. दुसऱ्या टप्प्यातही हाच विक्रम कायम ठेवण्याची तयारी इंदूरच्या प्रशासनानं केली आहे.

गर्भवती महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम

जिल्हाधिकारी मनिष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 95 टक्के नागरिकांना एक डोस देण्यात आला आहे. उरलेल्या 5 टक्के नागरिकांना पहिला डोस दिल्यानंतर 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. त्याचसोबत गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठीही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. त्यासाठी विशेष लसीकरण केंद्रं उभारण्यात येणार आहेत.

हे वाचा -अमिताभ यांच्या गाडीत पोलिसांनी पकडलं 'सलमान'ला, कागदपत्राशिवाय चालवत होता कार

पुन्हा रचणार इतिहास

21 जून ते 3 जुलै या काळात इंदूरमध्ये पहिला महालसीकरण अभियान राबवण्यात आलं होतं. मध्यप्रदेशातील विविध विभागांच्या तुलनेत इंदूर अग्रस्थानी असल्याचं सिद्ध झालं होतं. अधिकाधिक लसीकरणाच्या स्पर्धेत इंदूरचा पहिला, सीहोरचा दुसरा तर उज्जैनचा तिसरा क्रमांक आला होता. विशेषतः इंदूरच्या शहरी भागात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यातही हाच विक्रम कायम ठेवण्यासाठी इंदूर सज्ज झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Indore