मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Coronaमुळे एकूण किती मृत्यू झाले?; भारताने WHO वर उठवले प्रश्न, म्हणाले, ''तुमची मोजण्याची पद्धत...''

Coronaमुळे एकूण किती मृत्यू झाले?; भारताने WHO वर उठवले प्रश्न, म्हणाले, ''तुमची मोजण्याची पद्धत...''

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे (corona virus infection) झालेल्या मृत्यूच्या संख्येबाबत भारतानं जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO)सवाल उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली, 17 एप्रिल: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे (corona virus infection) झालेल्या मृत्यूच्या संख्येबाबत भारतानं जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO)सवाल उपस्थित केले आहेत. मृत्यूची संख्या (number of deaths) मोजण्यासाठी WHO (World Health Organization) ने अवलंबलेली पद्धत योग्य नसल्याचं भारतानं म्हटलं आहे.

ANI च्या वृत्तानुसार आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारतासारख्या मोठ्या देशात जिथे एवढी मोठी लोकसंख्या आहे, तिथे असे फॉर्म्युला स्वीकारले जाऊ शकत नाही. भारताला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले कारण दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने एक लेख प्रकाशित केला होता, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, कोरोनामुळे मृत्यूच्या नेमक्या संख्येबाबत भारत WHO ला सहकार्य करत नाही.

आरोग्य मंत्रालयाने देशातील कोविड मृत्यूची गणना करण्याच्या WHO च्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणात, भारताकडून WHO ला 6 औपचारिक पत्रांची सीरिज पाठवण्यात आली होती. ही पत्रे नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान लिहिली गेली होती. या संदर्भात केवळ भारतच नाही तर चीन आणि बांगलादेशनेही चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे भारताचे तर्क

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, भारत या विषयावर WHO सोबत नियमित आणि गहन तांत्रिक देवाणघेवाण करत आहे. विश्लेषणात टायर-1 देशांमधून थेट प्राप्त मृत्यू डेटा वापरून गणितीय मॉडेलिंग प्रक्रिया वापरली जाते. टियर-II देशांचा डेटा (ज्यामध्ये भारताचा समावेश आहे) भारताचा मूळ आक्षेप निकालावर नाही (तो काहीही असू शकतो) पण त्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीवर आहे.

आकडे वेगवेगळे का?

मंत्रालयाने सांगितले की हे मॉडेल दोन भिन्न मृत्यूचे आकडे देते. भारताचे म्हणणे आहे की, टायर 1 देश आणि भारतातील 18 राज्यांचा डेटा जुळत नाही. भारत म्हणाला, अंदाजातील इतका मोठा फरक अशा मॉडेलिंगच्या वैधतेबद्दल आणि अचूकतेबद्दल चिंता निर्माण करतो. जर देशात कोविड-19 मुळे होणार्‍या मृत्यूची गणना केलेले मॉडेल अचूक असेल तर ते सर्व टियर I देशांसाठी देखील स्वीकारले पाहिजे.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Who