24 तासांत सर्वात जास्त रुग्ण झाले निरोगी, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाखांच्या घरात

24 तासांत सर्वात जास्त रुग्ण झाले निरोगी, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाखांच्या घरात

गेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 509 नवीन रुग्ण सापडले. तर, 857 जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वात जास्त निरोगी झाले.

  • Share this:

नवी दिल्ली,05 ऑगस्ट: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 509 नवीन रुग्ण सापडले. तर, 857 जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वात जास्त निरोगी झाले. एकाच दिवसात तब्बल 51 हजार 220 रुग्ण निरोगी झाले. भारतातील कोरोना ग्राफ पाहिला तर, देशातील 10 लाखांच्या लोकसंख्येत 1377 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. देशात सध्या 19 लाख 6 हजार 613 एकूण रुग्ण आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 5 लाख 86 हजार 244 सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 39 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 12 लाख 82 हजार 215 रुग्ण निरोगी झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 67.19 आहे. तर, सकारात्मकता दर - 8.47%

मृत्यू झालेले 68% पुरुष

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशाचा मृत्यूदर हा जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात मृत्यूदर 3.36% होता. जुलैमध्ये हाच मृत्यूदर 2.69% झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सर्वात जास्त म्हणजे 68% पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर, 32% महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 5, 2020, 10:30 AM IST

ताज्या बातम्या