साधा सर्दी-खोकला-ताप आला तरी आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, अशीच भीती अनेकांना वाटते. त्यामुळे लोक आपली आरटी-पीसीआर चाचणी करून घेतात.
पण सरसकट कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ( Indian Council of Medical Research) सांगितलं आहे.
आयसीएमआरने आरटी-पीसीआर चाचणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये कुणी ही टेस्ट करावी आणि कुणी करू नये, हे सांगितलं आहे.
होम आयसोलेशनचे दहा दिवस पूर्ण झाले असतील आणि त्यातील शेवटचे तीन दिवस ताप नसेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करू नये.
रॅपिड अँटिजेन टेस्टवर (Rapid Antigen Testing) भर देण्यास सांगितलं आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत आणि त्यांची RAT टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांची RT-PCR टेस्ट करावी.