मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आवश्यकता नसताना शेकडो लोक रुग्णालयात भरती; प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांविरोधात कारवाईचे आदेश

आवश्यकता नसताना शेकडो लोक रुग्णालयात भरती; प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांविरोधात कारवाईचे आदेश

अनेक रुग्णांचा संसर्ग नसतानाही ते रुग्णालयात दाखल होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नोएडा, 24 एप्रिल : सध्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक रुग्णांचा संसर्ग नसतानाही ते रुग्णालयात दाखल होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. परिणामी ज्यांना गरज आहे, अशा गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना नोएडा येथे घडली आहे. नोएडा (Noida) आणि ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) खासगी रुग्णालयात ज्यांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही, असेही दाखल होत असल्याचं समोर आलं आहे. गौतम बुद्ध नगर (Gautam Buddh Nagar) जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. सोबतच प्रशासनाने या रुग्णालयांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

खासगी रुग्णालयातून रिकामी केल्या खाटा

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शुक्रवारी चीफ मेडिकल ऑफिसर (CMO) दीपक ओहरी यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या टीमने गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातून अनेक खासगी रुग्णालयांचा दौरा केला. येथे खासगी रुग्णालयाच्या प्रबंधकांनी कोणतेही कारण नसता रुग्णांना भरती केलं होतं. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची मूळात गरजच नव्हती. आरोग्य विभागाने असे तब्बल 200 बेड्स रिकामी केले आहेत.

हे ही वाचा-कोरोना संकटात रुग्णांच्या नातेवाईकांची लूट, ICU बेडसाठी डॉक्टरने दीड लाख घेतले

ऑक्सिजन आणि औषधांबाबत अफवा

अनेक खासगी रुग्णालयाच्या प्रबंधकांनी ऑक्सिजन आणि औषधं संपण्याची अफवा पसरवून गोंधळ घातला आहे. डीएमने अशा रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. आज काही रुग्णालयांविरोधात कडक कारवाई केली जाऊ शकते. जिल्हा सूचना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दोषींविरोधात कारवाई

त्यांनी सांगितलं की, डीएम यांच्या निर्देशानुसार अनेक खासगी रुग्णालयांचा दौरा करण्यात आला आहे. यावेळी अनेक रुग्ण आवश्यकता नसताना रुग्णालयात भरती झाले होते. अनेक रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि औषधांबाबत अफवा पसरवली होती. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Corona patient, Corona virus in india