नवी दिल्ली, 12 जानेवारी- कोरोना विषाणूच्या (corona virus) डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. ओमिक्रॉनग्रस्तांना फ्लूसारखी लक्षणं (corona symptoms) दिसत असल्याचा दावा अनेक एक्सपर्ट करत आहेत. परंतु कोरोनाला महामारीऐवजी (corona epidemic) साधारण फ्लूसारखा आजार समजण्याची चूक अजिबात करू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. ओमिक्रॉनचा प्रसार अद्याप स्थिर झालेला नाही, असे WHO ने म्हटले आहे.
यूरोपमधील WHO च्या सीनिअर इमर्जंसी ऑफिसर कॅथरिन स्मॉलवूड यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही अजूनही अनिश्चिततेतून जात आहोत. व्हायरस अजूनही वेगाने विकसित होत आहे. नवी आव्हाने समोर उभी राहात आहेत. कोरोनाला एका परिसरातील मर्यादित आजार म्हणून अजूनही आम्ही घोषित करू शकत नाही.
स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज (pedro sanchez) यांनी कोरोना महामारीला फ्लूसारखा आजार मानून व्यवहार करा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर WHO कडून हे स्पष्टीकरण आले आहे. सांचेज सोमवारी एका रेडिओ इन्टरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की, कोविड-19 चे फ्लूसारखा कोणत्यातरी स्थानिक आजारासारखे मूल्यांकन करायला हवे.
खरंच! लस घेतलेल्यांना ICU मध्ये दाखल करावं लागत नाही; डॉक्टरांनी सांगितलं..
आता तशी वेळ आली आहे. कारण त्याच्या गंभीरतेची पातळी कमी होत आहे. याचा सरळ अर्थ आहे की, कोरोनावरील उपचार महामारीऐवजी एक स्थानिक आजार असल्याचे मानून करायला हवेत.
कोविड-19ला फ्लू का समजू नये?
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 आणि फ्लूच्या लक्षणांची गंभीरता माणसाच्या आरोग्यावरून निश्चित होते. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये दोन्ही इन्फेक्शन लोवर रेस्पिरेटरी सिस्टिममध्ये पसरून निमोनियासारख्या अडचणीत टाकणारे आजार उद्भवू शकतात.
मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक मोठी घसरण,तज्ज्ञांनी सांगितली ही 3 कारणं
नाक वाहणे, अतिसार, घसादुखी, मांसपेशी दुखणे आणि नाकबंद राहण्यासारख्या समस्या दोन्ही इन्फेक्शनमध्ये दिसून येतात. परंतु अनेक अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की, कोविड-19 हा आजार फ्लूपेक्षा खूप घातक आहे.
कोविड-19 आणि फ्लूमध्ये फरक कसा ओळखावा?
एका रिपोर्टनुसार, कोविड-19 आणि फ्लू या दोन्ही इन्फेक्शनमध्ये खोकला आणि ताप हे दोन्ही लक्षणे खूप लवकर दिसून येतात. परंतु कोविड-19मध्ये नाक बंद होणे आणि अतिसारासारखी लक्षणे कमी प्रमाणात आढळतात. तर फ्लूमध्ये अशी लक्षणे नेहमीच दिसून येतात. कोविड-19 इन्फेक्शन झालेल्या काही रुग्णांमध्ये थकवा आणि अंगदुखीसारखी लक्षणे दिसतात. तर फ्लू झालेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे खूपच तीव्रपणे दिसून येतात.
लक्षणांवर बारीक लक्ष ठेवून तुम्ही हा फरक ओळखू शकता. शरीरात ही लक्षणे दिसून आल्यानंतर त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. जवळपास दहा दिवस आयसोलेशनमध्ये रहा. संपर्कात आलेल्या लोकांना त्वरित तपासणी करून घेण्याच्या सूचना करा. लवकर बरे वाटावे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेऊन आराम करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Health, Who