जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / किती दिवसांपर्यंत कोरोना रुग्णाच्या मृतदेहातून होऊ शकतं संक्रमण; संशोधनातून महत्वपूर्ण माहिती उघड

किती दिवसांपर्यंत कोरोना रुग्णाच्या मृतदेहातून होऊ शकतं संक्रमण; संशोधनातून महत्वपूर्ण माहिती उघड

किती दिवसांपर्यंत कोरोना रुग्णाच्या मृतदेहातून होऊ शकतं संक्रमण; संशोधनातून महत्वपूर्ण माहिती उघड

महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यात (Thane) मे महिन्यात कोविड-19 (Covid-19) मुळे 40 वर्षीय एक महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : मृत्यूनंतर कोरोना व्हायरलची लागण झालेल्या व्यक्तीच्या (Coronavirus victims) मृतदेहापासूनही अनेक दिवसांपर्यंत संक्रमण (infectious after death) पसरू शकत असल्याची माहिती समोर आली आहे. जर्मनीमध्ये झालेल्या एका संशोधनात (German study) ही बाब समोर आली आहे. यूनिवर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग (University Medical Center Hamburg) येथे झालेल्या संशोधनाचा निकाल हा गंभीर प्रमाणात कोरोनामुळे संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या छोट्याशा सँम्पलवर आधारित आहे. संशोधकांनी याबाबत मोठ्या पातळीवर संशोधन करण्याची गरज व्यक्त केली आहे. कोविड-19 मुळे मृत झालेल्या 11 लोकांच्या पार्थिवावर केलं टेस्ट इमर्जिंग इन्फ्रेक्सियस डिसीज नावाच्या प्रसिद्ध जरनलमध्ये प्रकाशित या संशोधनातील टीमने रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या 11 जणांचा मृतदेह टेस्ट केला आणि नाकाच्या स्वॅबचा टेस्ट पुढील सात दिवसांपर्यंत सुरू ठेवला. ही टेस्ट प्रत्येक 12 तासाला घेण्यात आली. प्रत्येक वेळी मृत व्यक्तीच्या आरएनएमध्ये  SARS-CoV-2 ची पातळी दिसत होती. संशोधकांनी सांगितलं की, मृत व्यक्तीच्या पेशीत SARS-CoV-2 चं संक्रमण सात दिवसांपर्यंत पाहायला मिळालं. संशोधकांच्या टीमने हा महासाथीचा धोकादायक टप्पा असल्याचे सांगितले. याशिवाय या मुद्द्यावर मोठ्या पातळीवर संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारापूर्वी संक्रमण पसरलं महाराष्ट्रातील (Maharashtra)  ठाणे जिल्ह्यात (Thane) मे महिन्यात कोविड-19 (Covid-19) मुळे 40 वर्षीय एक महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती. ही घटना उल्हासनगर नगरपालिका परिषदेची असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा नगरपालिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की, नियमांचं उल्लंघन करीत तब्बल 70 जणं महिलेच्या अंत्यसंस्कारात सामील झाले. मृत्यूपूर्वीच महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात