मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाचा जास्त त्रास झालेल्या लोकांमध्ये हे मानसिक आजार बळावण्याची भीती : नवं संशोधन

कोरोनाचा जास्त त्रास झालेल्या लोकांमध्ये हे मानसिक आजार बळावण्याची भीती : नवं संशोधन

Severe COVID-19 Can Lead to Delirium: कोरोनाग्रस्त झाल्यानंतर गंभीर झालेल्या रुग्णांना डेलीरियम (delirium) नावाच्या आजाराचा धोका असतो. डेलीरियम हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती नेहमी गोंधळलेली असते.

Severe COVID-19 Can Lead to Delirium: कोरोनाग्रस्त झाल्यानंतर गंभीर झालेल्या रुग्णांना डेलीरियम (delirium) नावाच्या आजाराचा धोका असतो. डेलीरियम हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती नेहमी गोंधळलेली असते.

Severe COVID-19 Can Lead to Delirium: कोरोनाग्रस्त झाल्यानंतर गंभीर झालेल्या रुग्णांना डेलीरियम (delirium) नावाच्या आजाराचा धोका असतो. डेलीरियम हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती नेहमी गोंधळलेली असते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : कोरोनाचा (corona) भयानक प्रभाव आपल्या आयुष्यात किती काळ टिकेल, हे कोणालाच माहीत नाही. पण अनेकदा त्याचे दुष्परिणाम समोर येत राहतात. अनेक संशोधनात हे सिद्ध झालंय की, एका वर्षानंतरही कोरोना रुग्णांमध्ये अनेक लक्षणं दिसून येत आहेत. शिवाय, इतर प्रकारच्या समस्याही काही रुग्णांना त्रास देऊ लागतात. आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलंय की, कोरोनाग्रस्त झाल्यानंतर गंभीर झालेल्या रुग्णांना डेलीरियम (delirium) नावाच्या आजाराचा धोका असतो. डेलीरियम हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती नेहमी गोंधळलेली असते. यामध्ये रुग्णाची मानसिक स्थिती अत्यंत बिघडते आणि तो नेहमी गोंधळलेला असतो. या आजारात रुग्णाला कोणत्याही गोष्टीचा नीट विचार (Severe COVID-19 Can Lead To Delirium) करता येत नाही.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, महामारीच्या सुरुवातीलाच अमेरिकेत रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाच्या 150 रुग्णांवर केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात असं आढळून आलंय की, गंभीर कोविड आजारानं ग्रस्त असलेल्या 73 टक्के रुग्णांना डेलीरियम आजार होता. बीएमजे ओपन जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह

अभ्यासात असंही आढळून आलंय की, डेलीरियमनंतर रुग्णांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा त्रास होतो आणि त्यांना कोविड -19 शी संबंधित अधिक गंभीर लक्षणं दिसतात. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासाचे लेखक फिलिप व्लिसाइड्स यांनी सांगितलं की, कोविड इतर अनेक गुंतागुंतांशी संबंधित आहे, ज्यामुळं आजारी व्यक्ती दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होऊ शकते. या स्थितीत लवकर बरं होणं कठीण होतं. संशोधकांनी मार्च ते मे 2020 दरम्यान ICU मध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या एका सर्वेक्षणाचं विश्लेषण करून, त्यांच्या वैद्यकीय नोंदी आणि रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर केलेल्या चौकशीच्या आधारे हा निष्कर्ष काढला.

हे वाचा - खूशखबर! शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं

उदासीनता

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही जवळपास एक चतुर्थांश रूग्ण डिलीरियमने ग्रस्त असल्याचं या अभ्यासात आढळून आलंय. काही रुग्णांमध्ये ही लक्षणं अनेक महिन्यांपर्यंत होती. संशोधकांच्या मते, या परिस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर बरे होण्याची प्रक्रिया अधिक कठीण होऊ शकते. फिलिप म्हणाले की, अभ्यासाच्या निकालांच्या आधारे असं म्हणता येईल की, कोविड-19 ची गंभीर लक्षणं असलेल्या रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना नैराश्य आणि उन्मादाचा त्रास होण्याची शक्यता असते. 'एकंदरीत, हा अभ्यास दर्शवितो की, लसीकरण करणं आणि गंभीरपणं आजारी पडण्याचं टाळणं इतकं महत्त्वाचं का आहे,' ते म्हणाले. यामुळं नंतर मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर दीर्घकालीन विपरीत परिणाम (neurological consequences) होऊ शकतात.

हे वाचा - Banana Benefits: थंडीच्या दिवसात रोज एक केळ खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या योग्य वेळ

डिलिरियम रोग का होतो?

मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास डेलीरियम होऊ शकतो. या स्थितीत मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. यामुळं मेंदूलाही आघात होऊ शकतो, ज्यामुळं विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. डेलीरियमच्या रुग्णाच्या मेंदूमध्ये सूज वाढू शकते, ज्यामुळं गोंधळ आणि अस्वस्थता वाढते.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms