वुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस? चीनच्या निष्काळजीपणाचा पुरवा जगासमोर VIRAL VIDEO

वुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस? चीनच्या निष्काळजीपणाचा पुरवा जगासमोर VIRAL VIDEO

चीनमधील (China) वुहान (Wuhan) शहरात सध्या WHO ची टीम आहे. या टीमनं तपास सुरु करण्यापूर्वीच एक धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला आहे.

  • Share this:

वुहान, 17 जानेवारी :  सर्व जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उगम कुठे झाला? याचं उत्तर शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) विशेष टीम सध्या चीन (China) वुहान (Wuhan) शहरात पोहचली आहे. या टीमनं तपास सुरु करण्यापूर्वीच एक धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला आहे.

काय आहे व्हिडीओ?

चिनी मीडियातील दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. गुहेत व्हायरसचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकाला वटवाघुळानं चावल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही वैज्ञानिकांची टीम दोन वर्षांपूर्वी सार्स व्हायरसचा (SARS) शोध घेण्यासाठी गुहेत गेली होती. यावेळी या टीमनं सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही. तसंच प्रयोगशाळेतील नमुने तपासताना कोणतीही खबरदारी घेतली नाही, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

तैवानच्या न्यूज वेबसाईटच्या मते हा व्हिडीओ कोरोना महामारी (Corona Pandemic) सुरु होण्याच्या दोन वर्षांच्या आधीचा आहे. वुहानमधील इंस्टीट्यूट ऑफ व्हायरलॉजीचे वैज्ञानिक कोणत्याही सुरक्षेशिवाय नमुने गोळ करत होते. त्याचवेळी त्यापैकी एकाला SARS व्हायरसचा वाहक समजलं जाणारं वटवाघुळ चावलं. या व्हिडीओमध्ये चीनमधील वुहान शहरातील या प्रयोगशाळेत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचाही अंदाज येतो.

29 डिसेंबर 2017 रोजी चीनच्या सरकारी टीव्हीनं एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये काही वैज्ञानिकांना सार्स व्हायरसच्या उगमाचं संशोधन करत असलेलं दाखवलं होत. बायो सुरक्षेचे चार स्तर असूनही त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं होतं. या व्हिडीओमध्ये काहींनी  ग्लोज आणि पीपीई किट शिवाय वटवाघुळांना हातानी पकडलं होतं. तर अन्य काही जण इतर नमुने गोळा करत असल्याचं दिसत आहे.

तैवानच्या वेबसाईटच्या मते या व्हिडीओमधील चिनी वैज्ञानिकानं वटवाघुळानं चावल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. त्याचबरोर हे वटवाघुळ अनेक व्हायरसचे वाहक असू शकतात, असा अंदाज देखील यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

वटवाघुळ अनेक प्रकारच्या रोगांचे व्हायरसचे वाहक आहेत,  हे माहिती असूनही या वैज्ञानिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही.  त्यांच्या निष्काळजीपणामुळेच चीनसह संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसची साथ पसरली असावी असा आरोप करण्यात येत आहे.

Published by: News18 Desk
First published: January 17, 2021, 3:19 PM IST

ताज्या बातम्या