नवी दिल्ली, 09 जून : कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) काहीशी ओसरत असताना आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेत सर्वात जास्त लहान मुलांना (Coronavirus in child) संसर्ग होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांना लवकरात लवकर लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरत देशात लहान मुलांवर कोरोना लशीचं ट्रायल (Corona vaccine trial on children) सुरू होणार आहे. याआधीच एम्सने (AIIMS) एक धक्कादायक खुलासा केला आहे. लशीच्या चाचणीसाठी ज्या लोकांना निवडण्यात येतं, त्यांची सुरुवातीला आरोग्य चाचणी केली जाते. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, की नाही याबद्दलची तपासणी केली जाते. शिवाय त्यांची कोरोना चाचणीही केली जाते. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर लशीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती स्क्रिनिंगमधून समोर आली. हे वाचा - मुलांवरील ट्रायलआधीच कोवॅक्सिनबाबत महत्त्वाची अपडेट; भारत बायोटेकची मोठी घोषणा टीवी 9 भारतवर्ष ने दिलेल्या माहितीनुसार, एम्स तर्फे देशातील 10 शहरांमध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणातील रिपोर्टनुसार, देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच बरीच मुलं अशी होती ज्यांना कोरोना झाला होता मात्र, त्यांना त्याबद्दल माहिती नव्हती. या मुलांच्या पालकांनाही मुलांना कोरोना झाल्याची कल्पना नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तर केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असंही या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. जन्मानंतरच्या पहिल्या पाच वर्षांत लहान मुलांना अनेक लशी दिल्या जातात. या लशींमध्ये फ्लूची लसदेखील असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास या लशींमुळे मुलांमध्ये केवळ सौम्य लक्षणं दिसत असतील, अशी शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हे वाचा - मुलांवरील ट्रायलआधीच कोवॅक्सिनबाबत महत्त्वाची अपडेट; भारत बायोटेकची मोठी घोषणा जर एवढ्या मोठ्या संख्येने मुलांना कोरोनाचा संसर्ग होत आहे, तर त्यांच्यामध्ये नॅचरल इम्युनटी तयार झाली नसेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचं उत्तर हो असेल तर लशीची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर देताना एम्सचे व्हॅक्सिन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. संजय राय म्हणाले, मुलांना सौम्य संसर्ग होतो हे निश्चित आहे. मात्र, ते गंभीर झाल्यास लशीचा किती फायदा होऊ शकतो, याची माहिती मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे या मुलांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.