गुजरातमध्ये लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लिटर गोडेतेल आणि इतर अनेक भेटवस्तू लकी ड्रॉ स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत. ANI नं दिलेल्या माहितीनुसार अमदावद नगरपालिकेनं ही योजना सुरू केली आहे.
अहमदावदच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झोपडपट्टी आणि गरीब लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती.
अहमदावदच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झोपडपट्टी आणि गरीब लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या योजनेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी आता साप्ताहिक ‘लकी ड्रॉ’ ठेवण्यात आला असून नागरिकांचा प्रतिसाद त्यामुळे वाढत आहे.