Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक! Periods सुरू आहेत म्हणून दिली नाही लस, व्हॅक्सिनेशन सेंटरवर मिळाला 5 दिवसांनी येण्याचा सल्ला

धक्कादायक! Periods सुरू आहेत म्हणून दिली नाही लस, व्हॅक्सिनेशन सेंटरवर मिळाला 5 दिवसांनी येण्याचा सल्ला

याठिकाणी सरकारी लसीकरण केंद्रावर गेलेल्या काही महिलांना मासिक पाळी चालू असल्यामुळे त्यांना लस देण्यास तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे.

नवी दिल्ली, 03 जुलै: कोरोना (Corona) महामारीपासून बचाव करण्यासाठी प्रमुख साधन असलेलं लसीकरण (Vaccination in India) हळूहळू देशभर होत आहे. सरकारने मान्यता दिलेल्या लसी (Vaccine) लहान मुलं सोडता सर्व वयोगटांतील नागरिकांना दिल्याही जात आहेत. पण केंद्र, राज्य सरकारं आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय. कर्नाटकातील (Karnataka) रायपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. इथल्या सरकारी लसीकरण केंद्रावर गेलेल्या काही महिलांना मासिक पाळी चालू असल्यामुळे त्यांना लस देण्यास तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. रायपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या विद्या पाटील यांनी अशी माहिती दिल्याचं द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. विद्या पाटील म्हणाल्या, 'या महिला रायपूरमधल्या सरकारी लसीकरण केंद्रात (Vaccination Center) गेल्या होत्या. त्यांना मासिक पाळी (Period) चालू असल्याने पाच दिवसांनी येऊन लस घ्यायला सांगण्यात आलं. पाळीच्या दिवसात लस घेतल्यास जास्त थकवा येतो त्यामुळे नंतर या असं कारण त्यांनी दिलं.'  वास्तविक पाहता केंद्र सरकरने कुणी लस घ्यावी किंवा घेऊ नये याबद्दल माहिती आधीच जाहीर केली आहे. आता गर्भवती (Pregnant Women), स्तनदा महिलाही लस घेऊ शकतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गर्भवती महिलाही कोणत्याही काळात लस घेऊ शकतात आणि कोरोनापासून बचावासाठी सज्ज होऊ शकतात असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. हे वाचा-कोरोना झाल्यानं घेतली रजा, कंपनीनं केली कायमची सुट्टी; नैराश्यातून संपवलं जीवन इतक्या स्पष्ट सूचना असतानाही या महिलांना मासिक पाळीचं कारण देऊन लस देणं नाकारण्यात आल्याबदद्ल पाटील आणि या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत रायपूरचे डेप्युटी कमिश्नर आर. व्यंकटेश कुमार म्हणाले की आम्ही कोणत्याही सरकारी यंत्रणेला असे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील हा प्रकार का घडला हे शोधणं गरजेचं आहे आणि पुन्हा असं घडू नये यासाठीही काळजी घ्यायला हवी. गर्भारपणाच्या कोणत्याही टप्प्यावर गर्भवती घेऊ शकते लस एकीकडे असं चालू आहे तर दुसरीकडे गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी त्याही आता लस घेऊ शकतात. केंद्र सरकराने शुक्रवारी नॅशनल टेक्निकल अडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनॉयझेशन (NTAGI) नी केलेल्या शिफारशी मान्य केल्या आहेत. त्यामुळे गर्भवती महिलाही लस घेण्यासाठी कोविन (CoWIN) अपवर नोंदणी करू शकतात. अन्यथा त्या थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे की गर्भवती महिला गर्भारपणाच्या कोणत्याही टप्प्यावर लस घेऊ शकते. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Period, Periods

पुढील बातम्या