नवी दिल्ली, 29 जुलै : जगात आतापर्यंत कोरोनाविरुद्ध (Corona) रोगप्रतिकारक शक्ती (Antibodies) तयार करणाऱ्या अनेक लसी (Vaccines) आल्या आहेत. मात्र ज्या कंपनीची लस पहिल्यांदा घेतली, त्याच कंपनीची दुसरी लस घ्यावी, असं सांगितलं जातं. मात्र पहिली लस वेगळी आणि दुसरी लस (First and second vaccine) वेगळी घेतली, तर रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढायला मदत होत असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. याबाबत आतापर्यंतची निरीक्षणं आणि अनुभव यांच्या आधारे भारतातील धोरण ठरवलं जाणार आहे.
नुकतंच जर्मनीच्या चान्सलर ऍंजेला मर्केल (German Chancellor Angela Merkel) यांनी मॉर्डनाची लस टोचून घेतली. हा त्यांचा दुसरा डोस होता. पहिला डोस त्यांनी ऍस्ट्राझेनकाचा घेतला होता. लसींच्या बाबतीत मिक्स अँड मॅच पॉलिसी प्रमोट करण्यासाठीच त्यांनी असं केल्याचं सांगितलं जातं जगातील अऩेक देशांमध्ये सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेतल्यावर होणाऱ्या परिणामांबाबत संशोधन सुरू आहे.
भारतात सध्या बहुतांश नागरिकांना कोव्हिशिल्ड लस मिळाली आहे. त्याखालोखाल कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांची संख्या आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लसदेखील भारतात उपलब्ध आहे. तर अमेरिका आणि युरोपातील इतर काही लसनिर्मात्या कंपन्यांच्या लसी लवकरच भारतात उपलब्ध होणार आहेत. अऩेकदा ज्या कंपनीची लस पहिल्यांदा घेतली जाते, ती उपलब्ध नसल्याने नागरिकांना वाट पाहावी लागते. मात्र दोन लसी वेगवेगळ्या असल्या तरी चालतील, हे सिद्ध झालं, तर कोटयवधी नागरिकांना दिलासाच मिळणार आहे.
हे वाचा -राज कुंद्राच्या सासूबाईंची पोलीस स्टेशनमध्ये धाव, हे आहे त्यामागचं कारण
नव्या लसीची प्रतीक्षा
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीची तिसरी टप्प्याची चाचणी पार पडली आहे. त्याचे निष्कर्ष सरकारकडे आले असून लवकरच ही लस भारतीय बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याच्या चाचण्यांच्या निकालाबाबत चर्चा करून त्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भारत बायोटेकच्या लहान मुलांसाठीच्या लसीच्या चाचण्यादेखील अंतिम टप्प्यात असून त्याचीदेखील प्रतिक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.