मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /मुंबईकरांसाठी Good News; मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाईपासून सुटका होण्याची शक्यता, मनपाने मार्शल्सना दिल्या या सूचना

मुंबईकरांसाठी Good News; मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाईपासून सुटका होण्याची शक्यता, मनपाने मार्शल्सना दिल्या या सूचना

Mumbai News: कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. महाराष्ट्रही कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याच दरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Mumbai News: कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. महाराष्ट्रही कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याच दरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Mumbai News: कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. महाराष्ट्रही कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याच दरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मुंबई, 23 मार्च : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. लवकरच महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल असंही दिसत आहे. त्याच दरम्यान आता मुंबईकरांसाठी एक मोठी दिसालादायक बातमी (big relief for Mumbaikar) समोर आली आहे. मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) मास्क मार्शल्सना दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता मुंबईत मार्शलकडून मास्क न घातल्याबाबतची कारवाई आता थंडावणार आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून मास्क मुक्ती घोषित झालेली नाही त्यामुळे मास्क लावावाच लागणार आहे.

वाचा : DCGI ने Novavax लसीला दिली मान्यता, 'या' वयातील मुलांचे केले जाणार लसीकरण

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वॉर्डनिहाय मास्क मार्शलची कंत्राटे आता संपुष्ठात येत आहेत. त्यामुळे आता नव्या एजन्सीकरता मुंबई महापालिकेकडून निविदा काढल्या गेल्या आहेत. 24 वॉर्डमध्ये 24 वॉर्डनिहाय एजन्सी ऐवजी मुंबईत आता केंद्रीय एजन्सी नेमून नवे मार्शल्स नेमले जाणार आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती काय?

22 मार्च 2022 च्या आकडेवारीनुसार, राज्यात मंगळवारी (22 मार्च) 156 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात सध्या एकूण 1,159 सक्रीय रुग्ण आहेत. मंगळवारी राज्यात एकूण 269 बाधितांनी कोरोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकूण 77,23,737 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.11 टक्के इतका आहे. तर राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 1.82 टक्के इतका आहे.

वाचा : कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट; आता मोदी सरकार उचलणार मोठं पाऊल

कुठे किती रुग्णांची नोंद

मुंबई मनपा - 26

नवी मुंबई मनपा - 2

मीरा भाईंदर मनपा - 2

रायगड - 1

ठाणे मंडळ एकूण - 34

नाशिक मंडळ एकूण - 17

पुणे मंडळ एकूण - 39

कोल्हापूर मंडळ एकूण - 2

औरंगाबाद मंडळ एकूण - 51

लातूर मंडळ एकूण - 5

अकोला मंडळ एकूण - 7

नागपूर मंडळ एकूण - 1

चीनमध्ये वर्षभरानंतर Coronaमुळे दोन मृत्यू

चीनमध्ये जानेवारी 2021 नंतर दोन कोविड-19 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोना व्हायरसची ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगानं पसरत आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननं एका निवेदनात म्हटलं आहे की, शुक्रवारी जिलिनमध्ये कोविडमुळे दोन मृत्यू झाले. चीनमध्ये कोरोना संसर्गाची सर्वाधिक नवीन प्रकरणे जिलिन प्रांतातून येत आहेत. आतापर्यंत येथे 3000 हून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Face Mask, Mumbai