नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : यापुढे कोणत्याही ऑफिसात कोरोना पॉझिटिव्ह (Covid -19) रुग्ण सापडला तर ते ऑफिस बंद करत येणार नाही. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जुन्या नियमांमध्ये बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास कार्यालय बंद करण्याचा नियम हटवला आहे. मंत्रालयाने ऑफिसबाबत एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जारी केली आहे. या नव्या SOP नुसार कोणत्याही परिस्थितीत ऑफिस बंद करण्याचा पर्याय नाही. 1 - जर कोणत्या ऑफिसरमध्ये कोरोना संसर्गाबाबत एक किंवा दोन प्रकरणं समोर येतात, तर डिसइन्फेक्ट केली जाईल. यामध्ये रुग्ण गेल्या 48 तासात ज्या ठिकाणी वावरला त्या भागांमध्ये निर्जंतुकीकरण केलं जाईल. त्यानंतर ऑफिसातील काम पुन्हा सुरू होईल. 2 जर कार्यालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले तर ब्लॉक वा बिल्डिंग डिसइन्फेक्ट केलं जाईल. यापूर्वी 4 जून 2020 रोजी जारी केलेल्या जुन्या SOP नुसार… 1 जर कार्यालयात एक किंवा दोन संसर्गाची प्रकरणं समोर आली तर डिसइन्फेक्शनची प्रक्रिया केवळ त्या जागेवर सीमित राहिल. मात्र मोठ्या प्रमाणात संक्रमण झाल्यास बिल्डिंग वा ब्लॉक चांगल्या प्रकरे सॅनिटाइज केल्यानंतर 48 तासांसाठी बंद करण्यात येईल. यावेळी संपूर्ण स्टाफ Work-from-home करेल. जोपर्यंत कार्यालयातील स्वच्छता पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचारी घरुनच काम करतील. हे ही वाचा- Covid-19 चं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली जगभरात थैमान घातलेल्या कोरोना (Coronavirus)महामारीनं भारतातही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी देशभरात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine) सुरूवात झाली. या लसीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकांना पहिल्या टप्प्यातील कोरोना लस देण्यात आलेली आहे मात्र यानंतर कोरोना लसीकरण केलेल्या 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. या बातमीनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं या गोष्टीची माहिती दिली आहे. मात्र, मंत्रालयानं पुढे हेदेखील स्पष्ट केलं आहे, की यातील कोणाचाही मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही. शनिवारी भारताच्या आरोग्य मंत्रालयानं असंही सांगितलं, की गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरण केलेल्या लोकांमधील 3 जणांना मागील 24 तासात मृत्यू झाला आहे. मात्र, मंत्रालयानं पुढे हेदेखील स्पष्ट केलं, की देशात आतापर्यंत लसीकरणामुळे मृत्यू किंवा इतर काहीही गंभीर परिणाम झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







