खूशखबर! नोव्हेंबरमध्ये भारतालाही मिळणार कोरोनाची लस

खूशखबर! नोव्हेंबरमध्ये भारतालाही मिळणार कोरोनाची लस

आतापर्यंत 20 देशांनी रशियानं तयार केलेली लस खरेदी करण्यासाठी तयार झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 130 हून अधिक लशींवर (corona vaccine)  काम सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या लशीच्या स्पर्धेत रशियाने (russia) बाजी मारली आहे. मंगळवारी Sputnik V नाव असलेली कोरोनाच्या या लशीचा पहिला डोस राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलीला दिला. नोव्हेंबरपर्यंत जगभरातील देशांना कोरोनाची लस (corona vaccine) उपलब्ध होईल अशी माहिती लशीसाठी रिसर्च फंडिंग करणाऱ्या समूहाचे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी दिली.

आतापर्यंत 20 देशांनी रशियानं तयार केलेली लस खरेदी करण्यासाठी तयार झाले आहेत. भारतालाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकेल असा कयास आहे. या लशीनं मानवी चाचणीचा तिसरा टप्पा अद्याप पूर्ण केला नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे ही लस सफल झाली आहे असं म्हणता येणार नाही असंही तज्ज्ञांनी यावेळी सांगितलं.

हे वाचा-रशियानंतर आता आणखी एका देशानं तयार केली Corona Vaccine, लवकरच करणार घोषणा

"रशियाची ही लस जर यशस्वी ठरली तर ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे पाहावं लागेल आणि तसं असेल तर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे", असं दिल्ली एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल.

हे वाचा-रशियाने बनवली जगातील पहिली कोरोना लस; सुरक्षिततेबाबत WHOने दिली मोठी माहिती

RDIF चे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी मात्र ही लस सेफ असल्याचा दावा केला आहे. येत्या काही दिवसात लस दिल्यानंतरचा डेटाही प्रकाशित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत रशियानं लशीसंदर्भात कोणताही वैज्ञानिक डेटा प्रकाशित केला नाही. त्यामुऴे या लशीसंदर्भात अनेक सवालही उपस्थित करण्यात आले आहेत. रशिया भारताला ही लस नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून देऊ शकेल अशी माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 13, 2020, 7:36 AM IST

ताज्या बातम्या