मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /मोठी बातमीः 1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; फक्त या लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

मोठी बातमीः 1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; फक्त या लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

Coronavirus Vaccination: आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू केलं जाणार आहे. लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोदी सरकारनं मात्र मोठा धक्काही दिला आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 24 फेब्रुवारी : अखेर तो दिवस जवळ आलाच. सर्वसामान्यांची कोरोना लशीची प्रतीक्षा संपली. आता सर्वसामान्यांचंही लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान यापैकी काही जणांना मोफत कोरोना लस दिली जाईल तर काही जणांकडून शुल्क आकारलं जाईल, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

    1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना इतर आजार आहेत त्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. सरकारी केंद्रं आणि खासगी रुग्णालयात हे लसीकरण केलं जाईल. यामध्ये 10 हजार सरकारी केंद्रांचा आणि 20 हजार खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

    ज्यांना सरकारी केंद्रावर लस दिली जाईल, त्यांना मोफत लस मिळेल. तर ज्यांना खासगी रुग्णालयात लस दिली जाईल, त्यांच्याकडून शुल्क आकारला जाईल. कोरोना लशीसाठी किती पैसे घेतले जातील याबाबत आरोग्य विभाग दोन तीन दिवसांत घोषणा करेल, असंही जावडेकर यांनी सांगितलं.

    देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झालं. सध्या आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. 23 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 1.19 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

    23 फेब्रुवारीला दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 1.61 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यापैकी 63,458 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेतला. महाराष्ट्रात 9,29,848 जणांनी पहिला आणि 73,858 जणांनी दुसरा डोस अशा एकूण 10,03,706 लोकांनी लस घेतली.

    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid19, Elderly population, India, March 2021, Wellness, World After Corona