या महामारीबरोबरच काना-कोपऱ्यापर्यंत तिच्याविषयीचे गैरसमजही पसरले आहेत. कोविड-19 विरुद्धच्या लधाईएतील एक-एक टप्पा पार करताना एखाद्या नवीन समुदायातून एखाद्या नवीनच गैरसमजाला अंकुर फुटत आहेत. प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये हे अत्यंत सर्रासपणे दिसून येते. या चुकीच्या माहितीनुसार कोणत्याही कोविड लसीमुळे प्रजनन क्षमता, गर्भधारणा आणि स्तनपानासाठी धोका निर्माण होतो. या एका विधानामध्ये लाखो महिला आणि त्यांच्या कुटुंबांवर परिणाम करण्याची क्षमता होती. परिणामी जरी कोविड कोणामध्येही लिंगाधिष्ठीत भेदभाव न करता त्याच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही होत असला तरीही नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक होती. लसी बाहेर आल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातील डेटा हा मर्यादित असल्याने त्यावेळी त्यांना लस घेण्यासाठी मज्जाव केला गेला होता. शास्त्रीय तथ्यांच्या आधारे याला विराम मिळाला असला तरीही यामुळे समाजामध्ये लसीविषयीचा संकोच वाढीस लागला. मात्र, महिलांसाठीचा लसींच्या सध्याच्या उपल्ब्धतेमुळे, जागतिक स्तनपान मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या पार्श्वभूमीवर याविषयीच्या चर्चाना उधाण आले आहे. दरवर्षी, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा स्तनपान सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जातो, आणि ऑगस्ट महिना हा स्तनपान मास म्हणून साजरा केला जातो. 2021 साठीची थीम आहे "स्तनपान सुरक्षा: एक सामायिक जबाबदारी_"_. याचे मुले आणि मतांसाठी स्तनपानाचे महत्त्व आणि मुलांच्या एकंदर आरोग्य आणि कल्याणासाठीच्या योगादानामध्ये समग्रपणे समुदायाची जबाबदारी हे लक्ष्य आहे. स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, मातांसाठी, यामुळे स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो आणि मुलांमध्ये अंतर ठेवण्यामध्ये सुलभता मिळते. मुलांसाठी, ही त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करून त्यांना विविध संसर्गांपासून वाचवते आणि त्यांच्या ज्ञानात्मक विकासाला चालना देते. आईचे दूध हे नवजात बालकांच्या सामान्य वाढ आणि आरोग्याच्या विकासासाठी अत्यंत पोषक आहार असतो. यामध्ये असलेल्या अँटीबॉडीज संसर्गांच्या विरोधात नवजात बालकांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त असतात. जागतिक आरोग्य संघटना(WHO) जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान करण्याचा आणि किमान सहा महिन्यापर्यंत स्तनपान करण्याचा सल्ला देते, ते अन्य पूरक आहाराबरोबरच 2 वर्षे किंवा अधिक काळापर्यंत देता येते.1 मात्र, अनेक गैरसमजांमुळे, लस घेतलेल्या महिला त्यांच्या मुलांवर लसींचा विपरीत परिणाम होत नसल्याचे स्वीकारण्यास तयार होत नाहीत. परिणामी लस घेण्यास नकार देण्याबरोबरच अनेक प्रकरणांमध्ये स्तनपान करणेही बंद झाले आहे. तंत्रज्ञान आणि प्रमाणित माहितीचा मर्यादित प्रवेश असलेल्या ग्रामीण भारतामध्ये हे सर्रास घडते आहे. मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते(आशा), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि अंगणवाडी कार्यकर्त्या हे अडथळे पार करण्यासाठी अथक कार्य करत आहेत, परंतु महिला व बालके या दोघांनाही आरोग्य व पोषणाच्या गरजांची पूर्तता न होण्याचा धोका आहे. विज्ञानाने जगाला दाखवून दिले आहे की स्तनपान करणाऱ्या मुलांसाठी किंवा एक्स्प्रेस्ड ह्युमन मिल्क सेवन करणाऱ्या मुलांना लसीपासून धोका नसतो.2 WHO आणि UNICEF च्या मते, कोविड-19 संक्रमित मातांसह सर्व माता त्यांच्या नवजात आणि लहान बालकांना स्तनपान देऊ शकतात. कोविड-19 साठी कारणीभूत असलेल्या कोरोना व्हायरसचे विषाणू आईच्या दुधामध्ये सापडलेले नाहीत. काही संशोधानांनुसार, अगदी कोविड-19 चे संक्रमण झाल्यानंतरही डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ला आणि सूचनांनुसार मातांनी त्यांच्या बाळांना स्तनपान देणे सुरक्षित आहे.3 आईची कोविडसंदर्भातील स्थितीकडे लक्ष न देता स्तनपानाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. आजवरच्या कोविड-19 वरील संशोधने आणि कोविड-19च्या लसी कसे कार्य करतात याविषयीच्या माहितीनुसार, स्तनपान देणाऱ्या महिलांनी लस घेतली असता त्याचा त्यांच्या बाळांवर काहीही परिणाम होत नाही. लस घेतलेल्या महिलेच्या दुधामध्ये अँटीबॉडीजही असतात त्यामुळे मातांना त्यांच्या बाळांना व्हायरसपासून वाचवण्यासाठी मदतच होते.4,5,6 WHO च्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार माता खालीलप्रमाणे काळजी घेऊन त्यांच्या बाळांना स्तनपान देऊ शकतात:
- स्तनपान करताना स्वच्छता पाळावी तसेच मास्कचा वापर करावा किंवा तोंड आणि नाक झाकून घ्यावे
- बाळाला स्पर्श करण्याअगोदर व नंतर पाणी आणि साबण वापरून किमान 20 सेकंदांपर्यंत हात धुणे
- त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण.
जागतिक स्तनपान मासाचे लसीकरणाच्या प्रोत्साहनाशी आणि स्तनपान करणाऱ्या मातांमधील लसींविषयीच्या उत्साहाशी असलेला संबंध पाहता हा महिना आता बदलाला चालना देऊ शकतो. रेणुका बिर्गोडिया**,** कोऑर्डीनेटर**,** युनायटेड वे मुंबई व तारा रघुनाथ**,** कोऑर्डीनेटर**,** युनायटेड वे मुंबई संदर्भ:
- http://apps.who.int/iris/bitstream/10665/42590/1/9241562218.pdf
- https://www.unicef.org/vietnam/stories/frequent-asked-questions-covid-19-vaccines-and-breastfeeding
- https://www.euro.who.int/en/media-centre/sections/press-releases/2021/who-recommends-continuing-breastfeeding-during-covid-19-infection-and-after-vaccination
- 4 . https://news.harvard.edu/gazette/story/2021/03/study-shows-covid-19-vaccinated-mothers-pass-antibodies-to-newborns/
- https://www.cedars-sinai.org/blog/newborn-covid-19-immunity.html
- 6 . https://www.news-medical.net/news/20210407/COVID-19-antibodies-persist-in-breast-milk-for-months-following-mothere28099s-vaccination.aspx