Coronavirus चं संकट वाढलं तर जगभरात 16 सेकंदाला जन्माला येईल मृत बालक; UNICEF आणि WHO ने पहिल्यांदाच जारी केला संयुक्त इशारा

Coronavirus चं संकट वाढलं तर जगभरात 16 सेकंदाला जन्माला येईल मृत बालक; UNICEF आणि WHO ने पहिल्यांदाच जारी केला संयुक्त इशारा

Coronavirus चा मोठा फटका सध्या वृद्ध व्यक्तींना बसत आहे. पण आता WHO आणि UNICEF ने व्यक्त केलेल्या भीतीनुसार गर्भवती महिलांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

जिनिव्हा, 8 ऑक्टोबर : जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि  Unicef  म्हणजे संयुक्त राष्ट्र बाल निधीने कोरोनाच्या संकटाविषयी (Coronavirus pandem) आणखी एक भीती व्यक्त केली आहे.  कोरोनाचा मोठा फटका सध्या वृद्ध व्यक्तींना बसत आहे. पण आता या संघटनांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार गर्भवती महिलांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, कोरोनाचा कहर आणखी वाढला तर दर 16 सेकंदाला एक मृत मूल जन्माला येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर दरवर्षी 20 लाख मृत अर्भकं जन्माला येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. विकसनशील देशांमध्ये या संदर्भात मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

आज जागतिक आरोग्य संघटनेनं प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र बाल निधीचे कार्यकारी निदेशक  हेनरिटा फोर आणि सांगितलं की, प्रत्येक १६ सेकंदाला एक गर्भवती महिला मृत मुलाला जन्म देईल. यामुळे सुरक्षित उपचार, नीट काळजी घेणे आणि प्रशिक्षित डॉक्टरांकडून डिलिव्हरी करून घेतल्यानं ही समस्या येणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. महिला गर्भवती झाल्यानंतर 28 आठवड्यांनी  मृत मूल जन्माला आलं तर त्याला ‘स्टिलबर्थ’ असं म्हटलं जातं. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या घटना घडल्याचं देखील यावेळी संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. मागील वर्षी  सहारा आफ्रिका  किंवा दक्षिण आशियामध्ये प्रत्येक चार महिलांच्या पाठी 3 महिला मृत मुलाला जन्म देत होत्या.

कोरोनाच्या या संकटाचा सर्वच देशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सहारा आफ्रिका  किंवा दक्षिण आशियामध्ये झालेल्या ‘स्टिलबर्थ’ च्या अनेक घटना या डिलिव्हरीवेळी घडल्या आहेत. त्याचबरोबर कोरोनाचं संकट  वाढलं तर पुढील वर्षापर्यंत 117 विकसनशील राष्ट्रांमध्ये 2,00,000 ‘स्टिलबर्थ’ प्रकरणं घडू शकतात. त्यामुळं योग्य उपचार आणि काळजी घेतली तर या घटना कमी होऊ शकतात असं देखील संघटनेनं म्हटलं आहे. या संकट काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून 50 टक्के सुविधा कमी झाल्या आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, विकसनशील देशांमधील अल्पसंख्यांक महिलांमध्ये ही प्रकरणं अधिक आहेत. कॅनडामध्ये इन्यूइट जमातीच्या महिलांमध्ये ‘स्टिलबर्थ’ प्रकरण सर्वाधिक आहे.  त्याचबरोबर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये याचं प्रमाण सहा टक्के आहे.

First published: October 8, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या