Home /News /coronavirus-latest-news /

Omicron डेल्टा व्हेरियंटपेक्षा 70 पट वेगाने पसरतो! फुफ्फुसांसाठी किती धोकादायक? जाणून घ्या

Omicron डेल्टा व्हेरियंटपेक्षा 70 पट वेगाने पसरतो! फुफ्फुसांसाठी किती धोकादायक? जाणून घ्या

Omicron Variant Cases: हाँगकाँग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक मायकेल चॅन ची वाई आणि त्यांच्या टीमने ओमिक्रॉनला इतर जातींपासून यशस्वीपणे वेगळे केलं आणि इतर स्वरूपातील संसर्गाची मूळ SARS-CoV-2 शी तुलना केली. टीमला आढळले की ओमिक्रॉन मूळ SARS-CoV-2 आणि डेल्टा फॉर्मपेक्षा जास्त वेगाने मानवांमध्ये प्रतिकृती बनवतो.

पुढे वाचा ...
    बीजिंग, 17 डिसेंबर : कोरोना विषाणूचा नवीन ओमिक्रॉन (Coronavirus Omicron Variant) व्हेरिएंट डेल्टा आणि कोविड 19 च्या मूळ स्वरूपाच्या तुलनेत 70 पट संक्रमित आहे. मात्र, त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता खूपच कमी आहे, असे एका अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासात ओमिक्रॉन मानवी श्वसन प्रणाली कशी संक्रमित करतो, याबद्दल माहिती दिली आहे. हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले की ओमिक्रॉन डेल्टा आणि मूळ SARS-CoV-2 पेक्षा 70 पट वेगाने संक्रमित होतो. अभ्यासात असेही दिसून आले आहे की ओमिक्रॉनमुळे फुफ्फुसांत होणारे संक्रमण हे मूळ SARS-CoV-2 पेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे, जे रोगाची तीव्रता कमी दर्शवते. संशोधकांनी SARS-CoV-2 च्या इतर प्रकारांमधून ओमिक्रॉनचा प्रसार वेगळ्या पद्धतीने कसा होतो आणि त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता समजून घेण्यासाठी 'एक्स-व्हिवो कल्चर'चा वापर केला. ही पद्धत फुफ्फुसांवर उपचार करण्यासाठी फुफ्फुसातून काढलेल्या ऊतकांचा वापर करते. अशा प्रकारे ओमिक्रॉन इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरतो हाँगकाँग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक मायकेल चॅन ची वाई आणि त्यांच्या टीमने ओमिक्रॉनला इतर प्रकारंपासून यशस्वीरित्या वेगळे केलं. इतर स्वरूपातील संसर्गाची मूळ SARS-CoV-2 शी तुलना केली. टीमला आढळले की ओमिक्रॉन मूळ SARS-CoV-2 आणि डेल्टा फॉर्मपेक्षा जास्त वेगाने मानवांमध्ये प्रतिकृती विकसित करतो. संशोधकांनी सांगितले की संसर्ग झाल्यानंतर 24 तासांनंतर ओमिक्रॉनने डेल्टा आणि मूळ SARS-CoV-2 पेक्षा सुमारे 70 पट अधिक प्रतिकृती बनवली. मात्र, मूळ SARS-CoV-2 विषाणूच्या तुलनेत मानवी फुफ्फुसाच्या पेशींमध्ये Omicron 10 पट पेक्षा कमी प्रतिकृती तयार करते, हे सूचित करते की हा रोग कमी गंभीर आहे. चॅन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "मनुष्यांमधील रोगाची तीव्रता केवळ विषाणूच्या प्रतिकृतीद्वारेच नव्हे तर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीद्वारे देखील निर्धारित केली जाते हे नमूद करणे महत्त्वाचे आहे." देशात ओमिक्रॉन पसरतोय कोरोनाचे (Corona Virus) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) देशात झपाट्यानं पसरत आहे. आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही तासात, महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमध्ये (Kerala) 4-4 प्रकरणे, तेलंगणामध्ये 2 (Telangana), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) 1-1 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे देशातील ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या 88 वर पोहोचली. राज्यानुसार महाराष्ट्रात 32, राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, केरळमध्ये 5, गुजरातमध्ये 5, तर आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये 1-1 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona, Corona updates, Coronavirus

    पुढील बातम्या