मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

COVID-19 in India तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिला इशारा

COVID-19 in India तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिला इशारा

देशात व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याचा फायदा होत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांनी यूकेसारख्या देशांचा उल्लेख केला, जिथे कोविड -19 ची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : जगातील काही देशांमध्ये आता पुन्हा कोरोना (corona) रुग्णसंख्या वाढू लागली आहे. युरोपीय देशांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारताचा विचार करायचे झाल्यास सणासुदीच्या काळात लोकांनी खबरदारी घेतली आणि देशात कोरोनाचे (COVID-19 in India) कोणतेही नवे स्वरूप समोर आलं नाही, तर भारताला कदाचित दुसऱ्या कोरोना लाटेसारखा फटका बसणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सध्या भारतात जरी कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत असली तरी कोरोना पूर्ण कमी होईल, असे म्हटले जाऊ शकत नाही. कोणत्याही कारणानं पुन्हा कोरोना रुग्ण वाढतील याबाबत खात्रीलायक सांगता येत नाही.

देशातील सध्या दसरा आणि दिवाळी यांसारखे अनेक सण पाहता, तज्ञांनी इशारा दिला आहे. सध्याच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट होणे हे कोरोना संपत असल्याचे लक्षण नाही. अनेक ठिकाणी आजही मृत्युदर जास्त आहे. देशात व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याचा फायदा होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी यूकेसारख्या देशांचा उल्लेख केला, जिथे कोविड -19 ची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. भारतात कोविड -19 लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा गाठल्यानंतर एक दिवसानंतर व्हायरलॉजिस्ट शाहीद जमील म्हणाले की, लसीकरणाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, परंतु ते आणखी वाढवण्याची गरज आहे.

हे वाचा - गुंतवणूक न करता Cryptocurrency तून कमवा पैसे, नुकसान झाल्यास होईल 5 हजारांचा फायदा

भारतातील आघाडीच्या विषाणूशास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या शाहीद जमील यांनी पीटीआयला सांगितले की, मला अजूनही खात्री नाही की, आपल्याकडील कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. आपण हा (100 कोटी) मैलाचा दगड साजरा करत असताना, अजून काही कामे बाकी आहेत. कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत, पण अजून तिथे पोहोचलो नाही.

हे वाचा - रशियामध्ये कोरोनाचा कहर; दिवसा 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्यानं प्रशासन हतबल

नवीन प्रकरणे कमी, परंतु संकट अजूनही कायम

भारतात कोरोना संसर्गामुळे आत्तापर्यंत 4,53,708 लोकांचा मृत्यू झाला आहेत. शनिवारी, कोरोनाच्या 16,326 नवीन प्रकरणांमध्ये थोडी वाढ दिसून आली. गेल्या 29 दिवसांपासून नवीन प्रकरणे 30,000 च्या खाली आहेत. आता दिवाळीला फक्त काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तज्ञांनी सांगितले की, कोरोनाचा आलेख खाली जात आहे हा फक्त समाधानाचा एक भाग आहे. जर आपण ब्रिटनकडे पाहिले तर तेथेही कोरोनाचे आकडे झपाट्याने कमी होत होते, परंतु नंतर प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus