नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : बहुतेक देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) हाहाकार माजवतो आहे. यामागील नेमकं कारण समोर आलं आहे (Delta variant spread reason). भारत (India), यूके (UK) आणि यूएसमधील (US) शसास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं. संसर्गजन्य वाढवताना अँटिबॉडीजला तटस्थ करण्याची क्षमता हे यामागील मुख्य कारण असल्याचं संशोधकांना दिसून आलं.
भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, सीएसआआर इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी, यूकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमधील संशोधकांनी डेल्टासा देतो व्हेरिएंट रोगप्रतिकारक प्रतिक्रियेला चकवा कसा देतो हे तपासलं.
हे वाचा - दिलासा! नवा Variant आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी; तज्ज्ञांचं मत
संशोधकांनी ज्यांना आधी कोरोना झाला होता किंवा ज्यांना ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाची किंवा फायझरची लस घेतली आहे, अशा व्यक्तींच्या रक्तातील नमुन्यातून सीरम घेतलं. यामध्ये संसर्ग किंवा लशीमुळे निर्माण झालेल्या अँटिबॉडीज असतात.
संशोधकांना दिसून आलं की अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेच डेल्टा व्हेरिएंट ज्यांना कोरोनाची लागण आधी झाली आहे, त्यांच्या सेराला 5.7 पट कमी संवेदनशील होता. तर लशीच्या सेराला आठपट कमी संवेदनशील होता. सोप्या भाषेत सांगायचं तर व्हायरसला ब्लॉक करण्यासाठी लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या आठपट जास्त अँटीबॉडीज घेतल्या जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Delta virus