नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या वेगानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 32 लाख झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ 2 दिवसात एक लाख नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 60 हजार 975 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 848 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31 लाख 67 हजार 323 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 7 लाख 4 हजार 348 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 58 हजार 390 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 24 लाख 4 हजार 585 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना प्रभावित राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 75.9% झाला आहे. तर मृत्यूदर 1.8% आहे.
महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 7 लाखांच्या घरात Coronavirus चे नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी होऊन, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होते, त्या वेळी Covid साथीचा आलेख सपाट झाला आणि साथ आटोक्यात आली असं म्हणता येतं. पण महाराष्ट्रात अजूनही हा आलेख चढाच आहे. Corona रुग्णांची संख्या 7 लाखांजवळ पोहोचली तरी धोका अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा 11,015 नव्या Covid positive रुग्णांंची भर पडली आहे.