जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus: कोरोनाने वाढवलं टेन्शन; केंद्राचं महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र, राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची चिन्ह

Coronavirus: कोरोनाने वाढवलं टेन्शन; केंद्राचं महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र, राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची चिन्ह

Coronavirus: कोरोनाने वाढवलं टेन्शन; केंद्राचं महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र, राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची चिन्ह

Coronavirus news updates: कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना पत्र पाठवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल : गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध (restrictions to prevent covid19) मागे घेण्यात आले. त्यामुळे मास्क (Face mask) सक्तीही आता राहिली नाही आणि मास्क परिधान करणं ऐच्छिक करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून असलेली मास्क सक्ती हटवण्यात आल्यामुळे नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता (May be mask compulsory again in Maharahstra) वर्तवण्यात येत आहे. त्यामागचं कारण म्हणजे वाढती कोरोना बाधितांची संख्या आणि त्याच दरम्यान केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पाठवलेलं पत्र. भारतातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. वाचा :  Corona पुन्हा धुमाकूळ, वाढत्या रुग्णसंख्येनंतर केंद्र सरकारनं ‘या’ राज्यांना केलं Alert महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. या निर्णयाला 20 दिवस उलटत नाहीत तोवर आता केंद्राने पुन्हा एकदा अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीत याबाबत काय चर्चा होते का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ‘राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे पण…’ कोरोनाच्या संदर्भातील निर्बंध हटवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला काही आवाहन केले होते. कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात