कमाल! 'Dating App 1-सरकार 0', हॉस्पिटल नाही तर Tinder वर मिळाला प्लाझ्मा डोनर

कमाल! 'Dating App 1-सरकार 0', हॉस्पिटल नाही तर Tinder वर मिळाला प्लाझ्मा डोनर

कोरोनाच्या या कठीण प्रसंगात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांना मदत मिळत आहे. अशाच एका महिलेला ‘टिंडर’ या डेटिंग (Tinder Dating App ) ॲपवरून प्लाझ्मा डोनर मिळाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल: देशात कोरोनारुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. रुग्णांची संख्या सतत वाढत असून बेड्स, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि इतर औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. अशा परिस्थितीत लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांना मदत मिळत आहे. अशाच एका महिलेला ‘टिंडर’ या डेटिंग (Tinder Dating App ) ॲपवरून प्लाझ्मा डोनर मिळाला. याबाबतचा किस्सा तिने ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.

सोहिनी चटोपाध्याय असे महिलेचे नाव आहे. सोहिनीच्या मैत्रिणीला कोरोना झाला होता आणि तिच्यासाठी प्लाझ्मा डोनरचा (Plasma donor) शोध सुरू होता. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक रुग्णालये आणि पोलीस हेल्पलाईन नंबरवरदेखील संपर्क साधला. मात्र, त्यांना डोनर मिळाला नाही. त्यानंतर त्या मैत्रिणीने टिंडर बायोमध्ये (Tinder Bio) कोरोना पॉझिटीव्ह असल्याने प्लाझ्मा डोनर पाहिजे, असं लिहिलं होतं. त्या दरम्यान चट्टोपाध्याय आणि त्या मैत्रिणीला एक मुलगा Tinder वर सापडला, ज्याला काही दिवसांपूर्वी कोरोना होऊन गेला होता. त्याने त्याच्या बायो मध्ये देखील तसं लिहिलं होतं. सोहिनीने त्याच्याशी संपर्क साधला आणि मित्रासाठी प्लाझ्मा मिळवला.

तिने एक ट्वीट शेअर करत 'आम्हाला टिंडरवर प्लाझ्मा मॅच सापडला, डेटिंग अॅप 1- सरकार 0' असं ट्वीट केलं आहे. यानंतरही तिने काही ट्वीट करत तिचा अनुभव शेअर केला आहे.  ‘विचित्र परिस्थितीत घडलेलं काहीतरी चांगलं,’ असे कॅप्शन देत सोहिनीने हा किस्सा शेअर केला आहे. ती म्हणते, की मी टिंडरवर प्लाझ्मा डोनर शोधत नव्हते, मात्र, स्वेच्छेने एकजण सापडला आणि त्याने प्लाझ्मा डोनेट केला, याचा आनंद आहे. तसेच प्लाझ्माची गरज असलेल्या मैत्रिणीची ब्येत सुधारत असून तिला आता प्लाझ्माची गरज नाही, असेही तिने सांगितले. टिंडरवरील बऱ्याच जणांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी (Plasma Donation) संपर्क साधा असे बायोमध्ये लिहिले असल्याचेही सोहिनीने नमूद केले आहे.

सोहिनी टिंडरवर प्लाझ्मा डोनर शोधण्यात यशस्वी ठरली. मात्र, सगळ्यांचेच नशीब इतके चांगले नसते. याचा प्रत्यय दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली की येतो. या राज्यांमध्ये लोकांना प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. सोशल मीडियावर (Social Media) प्लाझ्मासाठी मदत मागणारे लाखो मेसेजेस फिरत आहेत. गेल्या गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्लाझ्माच्या तुटवड्याकडे लक्ष वेधले आणि कोरोनातून बरे झालेल्या लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जास्त दिवसांपूर्वी कोरोनातून बरे झालेल्या लोकांचा प्लाझ्मा कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले होते.

प्लाझ्मा थेरेपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्यांचा प्लाझ्मा हा गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटिबॉडीज (Antibodies) या रुग्णांवर उपचार करण्यास फायदेशीर ठरतात.

First published: April 23, 2021, 8:19 AM IST

ताज्या बातम्या