मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /चिंता वाढली! पुन्हा नवीन रुग्णांची संख्या 90 हजारांच्या घरात, वाचा लेटेस्ट आकडेवारी

चिंता वाढली! पुन्हा नवीन रुग्णांची संख्या 90 हजारांच्या घरात, वाचा लेटेस्ट आकडेवारी

मंगळवारी 75 हजार कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा 89 हजार 706 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

मंगळवारी 75 हजार कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा 89 हजार 706 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

मंगळवारी 75 हजार कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा 89 हजार 706 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 43 लाख पार झाला आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा एकजा रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. मंगळवारी 75 हजार कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा 89 हजार 706 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या 43 लाख 70 हजार 129 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासांत 1115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांची संख्या 73 हजार 890 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 33 लाख 98 हजार 845 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर अजूनही 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 10 लाख लोकसंख्येत 3,102 रुग्ण सापडत आहेत. भारताच्या तुलनेत इतर देशांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी आहे. असे असले तरी भारताचे मृत्यूदर केवळ 1.70% आहे, जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हा कमी आहे.

राज्यांची परिस्थिती

जगभरातील परिस्थिती

वर्ल्डोमीटरनुसार अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आज सकाळपर्यंत 65 लाख 14 हजार झाली आहे. यातील 1 लाख 94 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, भारतात 43 लाख लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. यातील 74 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ब्राझीलमध्ये 41 लाख 65 हजार कोरोनाबाधित आहेत. तर, 27 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर सर्वात जास्त ब्राझीलमध्ये आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona virus in india