नवी दिल्ली, 01 मे : कोरोनाव्हायरसमधून (Coronavirus) बरे झालेले काही रुग्ण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचं अनेक देशांमध्ये दिसून आलं आहे. चीन, दक्षिण कोरिया, मकाऊ, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांमध्येही अशीच प्रकरणं आहेत. कोरोनातून पूर्णपणे ठणठणीत झालेले आणि डिस्चार्ज दिलेले रुग्ण 70 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरसचा रुग्ण बरा झाल्यानंतरही काही व्हायरस फुफ्फुसात (lung) खोलवर लपून राहतात आणि सध्या होत असलेल्या टेस्टमधून ते दिसून येत नाहीत आणि हेच व्हायरस पुन्हा सक्रिय होत असावेत. हे वाचा - Coronavirus वर मात करणारी देशातील ‘ती’ पहिली कोरोना रुग्ण सध्या काय करतेय? कोरिया सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे (KCDC) संचालक जेआँग उन किआँग म्हणाले, “कोरोनातून बरा झालेला रुग्ण पुन्हा संक्रमित होण्याऐवजी त्याच्या शरीरात असलेला व्हायरस कदाचित पुन्हा सक्रिय होत असेल” आणि याच थिएरीवर चीनमध्ये अभ्यास करण्यात आला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनमधील संशोधकांना दिसून आलं की, जे रुग्ण कोरोनातून बरे झालेत, त्यांच्या फुफ्फुसात व्हायरस भरपूर कालावधीपर्यंत लपून राहू शकतो. सध्या केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्टमध्ये या लपलेल्या व्हायरस दिसू शकत नाही. हे वाचा - नॅनोमेडिसीनने होऊ शकतात Coronavirus वर उपचार, शास्त्रज्ञांचा दावा दक्षिण-पश्चिम चीनच्या चाँगकिंगमधील आर्मी मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमचे प्रमुख डॉ. बियान शिउवू यांनी 78 वर्षांच्या एका महिलेच्या पोस्टमॉर्टेमच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे. ही महिला कोरोनामुक्त झाली होती आणि तीन वेळा कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाला. द वीक च्या रिपोर्टनुसार, या महिलेचं पोस्टमॉर्टेम केल्यानंतर लिव्हर, हार्ट, आतड्या, त्वचा, बोनमॅरोमध्ये कोरोनाव्हायरस सापडले नाहीत, मात्र फुफ्फुसांच्या टिश्यूंमध्ये व्हायरस सापडले. संशोधकांनी या महिलेच्या फुफ्फुसाचे टिश्यूज इलेक्ट्रॉन मायक्रोस्पमार्फत तपासले तेव्हा फुफ्फुसात खोलवर व्हायरस होते. लपलेले कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांमध्ये लक्षणांच्या रूपात बाहेर येत नाहीत, ते फुफ्फुसात असेच राहतात आणि भरपूर दिवसांनंतर पुन्हा सक्रिय होऊन बऱ्या झालेल्या रुग्णाला पुन्हा आजारी पाडतात. असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आङे. हे वाचा - Coronavirus : मुंबईत प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग केलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू “सध्या कोरोना टेस्टसाठी जे नमुने घेतले जात आहेत, त्यात फुफ्फुसांचे खोलवर नमुने घेतले जात नाही. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी फुफ्फुसांची तपासणी होणंही गरजेचं आहे”, असं संशोधक म्हणालेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.